श्री समर्थांच्या पादुका जालन्यात; सात दिवस प्रचार दौरा व भिक्षाफेरीचे आयोजन

जालना – श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या मुख्य उद्देशाने श्रीरामदासस्वामी संस्थान, श्रीक्षेत्र सज्जनगड यांचा पादुका प्रचार दौरा व भिक्षाफेरीचे आयोजन करण्यात आले आहे . सज्जनगडाहून निघालेल्या पादुका शुक्रवारी जालन्यात पोहचल्या तेंव्हा जय जय रघुवीर समर्थच्या घोषणांनी व रांगोळ्या-फुलांच्या पायघड्यांनी पादुकांचे भव्य स्वागत करण्यात आले. समर्थांच्या जयघोषात सुवासिनींनी पंचारतीने पादुकांचे औक्षण केले.
कचेरी रोड येथील श्री बालाजी मंदिर ते शनि मंदिर मार्गे आनंदवाडी येथील श्रीराम मंदिरादरम्यान पादुकांची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती.
यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. अवघे वातावरण धार्मिक झालेले होते. जागोजागी महिलांनी सडा, रांगोळ्या व फुलांची उधळण केली होती. यावेळी पादुकांसोबत समर्थ वंशज तथा श्रीरामदासस्वामी संस्थानचे अध्यक्ष व अधिकारी स्वामी प.पू.भूषण महारूद्र स्वामी यांच्यासह सज्जनगडावरील रामदासींची प्रमुख उपस्थिती होती. डोक्यावर मंगल कलश घेऊन महिला. भजन व मृदूंंगाचा गजर करत सर्व भाविक तल्लीन होऊन पालखीत सहभागी झाले. दरम्यान २४ जानेवारीपर्यंत आनंदवाडी येथील श्रीराम मंदिरात पादुका भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत. या पादुकांच्या स्वागताला भगवान महाराज आनंदगडकर, रामदास महाराज आचार्य, भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्करराव दानवे, यांच्यासह समर्थभक्तांची उपस्थिती होती.
दरम्यान भिक्षाफेरी ही शहरात दररोज विविध ठिकाणी सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत होणार असून समर्थांच्या पादुका पूजन व वैयक्तीक पादुका पूजन करण्याची संधीही समर्थभक्तांना लाभणार आहे. दरम्यान पादुका पुजनाच्या ठिकाणीसुद्धा भिक्षा स्विकारण्यात येणार असल्याचेही संस्थानच्यावतीने सांगण्यात आले आहे. पादुका पूजनासाठी गिरीष देशमुख, मुकूंद गोसावी, कौस्तुभ जोशी, विनायक देहेडकर, यज्ञेश्वर जोशी, कल्याण आचार्य, प्रणव जोशी, महेश साळगावकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*असा असेल भिक्षा फेरी दौरा*
शनिवार दि.१८ रोजी आनंदवाडी, सरस्वती कॉलनी, जुमना नगर, विद्युत कॉलनी, सहकार बँक कॉलनी, रविवार दि.१९ रोजी कांचन नगर, शिवनगर, समर्थ नगर, भाग्य नगर, संजोग नगर, गोकुळ नगरी, सोमवार दि.२० रोजी सराफ नगर, घायाळ नगर, इनकम टॅक्स कॉलनी, म्हाडा कॉलनी, हरीओम नगर, निलम नगर, नरिमन नगर, सोनल नगर, नवा मोंढा मंगळवार दि.२१ रोजी वृंदावन कॉलनी, योगेश्वर कॉलनी, छत्रपती कॉलनी, निळकंठ नगर, शास्त्री वस्ती, गणपती गल्ली, कपूर गल्ली, आनंदीस्वामी गल्ली, कचेरी रोड, गवळी वस्ती, बुधवार दि.२२ रोजी टाऊन हॉल, माळीपुरा, कसबा, देहेडकरवाडी, डबल जीन, सिंगल जीन, लक्ष्मीनारायणपुरा, भालेनगरी, निसर्ग गार्डन, गुरुवार दि.२३ रोजी नवीन जालना, रामनगर या मार्गे असणार आहे.
अधिक माहिती वाचा …
डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172