लुटारूंचा सोनारावर दोन तास तर पोलिसांचा लुटारूंवर तीन दिवस “वॉच”

जालना- सोन्या चांदीचा व्यवसाय करणारे जालन्यात राहणारे सोनार सचिन सुरेश खर्डेकर हे दिनांक 15 जानेवारी रोजी रामनगर येथील आपला व्यवसाय करून जाण्याकडे येत होते. सहा वाजेच्या सुमारास त्यांना जालना रामनगर रस्त्यावर सिंधी काळे जवळ अज्ञात लुटारूंनी वाहन आढळून लुटले। यामध्ये सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल लुटला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे आला या तपासा दरम्यान लुटारू हे सचिन खर्डेकर या सोनाराची रस्त्यावर दोन तास वाट पाहत होते आणि त्या संदर्भात वेळोवेळी या सोनाराच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तीन लुटांपैकी एक लुटारू माहिती देत होता. शेवटी सहा वाजता या तिघांनी सोनाराला लुटले आणि एकाने माहिती पुरवली .असे एकूण चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. यामध्ये गणेश महादेव शेजवळ 22 वर्ष राहणार वाल वाल्मिक नगर जालना, विशाल अजयसिंग राजपूत वय 22 वर्ष राहणार लोधी मोहल्ला, जयेश किशोर राजपूत वय बावीस वर्षे राहणार गांधीनगर, अभिजीत राजेश पवार वय बावीस वर्षे राहणार रामनगर यांनी केल्याची कबुली दिली आणि मुद्देमाल ही काढून दिला आहे. दरम्यान सोनाराला लूटण्यासाठी या चौघांनी सोनारावर दोन तास “वॉच” ठेवला होता तर या आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुना शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळावर तीन दिवस “वॉच” ठेवला होता. त्यामुळे घटनास्थळावर घडलेल्या घडामोडी आणि बारकाईने निरीक्षण केल्यानंतर हे आरोपी हाती लागले आहेत.
अधिक माहिती वाचा …
डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172