जालना- जालना जिल्हा परिषदेमध्ये ग्रामीण भागातील जनतेच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा हा स्वतंत्र विभाग आहे. या स्वतंत्र विभागामार्फत पाणीपुरवठ्याची व्यवस्था करत आयुष्यातील 30 ते 35 वर्षे खर्च घालणाऱ्या सेवा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर जालना जिल्हा परिषदेच्या उदासीनतेमुळे उपासमारीची वेळ आली आहे.
जालना जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये सुमारे पाच वर्षांपूर्वी 50 कर्मचारी सेवानिवृत्त झाले .या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवेच्या दरम्यान कपात झालेली ग्रॅच्युईटी आणि सेवा उपदानाची सुमारे नऊ कोटींची रक्कम जालना जिल्हा परिषदेकडे थकली आहे ही रक्कम थकली असतानाच गेल्या सात महिन्यांपासून जिल्हा परिषदेने या सेवानिवृत्तांचे नियमित वेतन देखील दिलेले नाही अशा प्रकारे एकूण सेवा निवृत्ती वेतन आणि इतर सेवा उपदान दोन्ही रक्कम मिळून जालना जिल्हा परिषदेकडे 11 कोटी रुपये थकलेले आहेत. सेवा उपदान आणि ग्रॅच्युइटी ची रक्कम ती वेळेनुसार द्या! परंतु नियमित सेवानिवृत्ती वेतन तरी द्यावे अशी कळकळीची मागणी हे सेवानिवृत्त करत आहेत. उतार वयात यांना आता जालना जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. या सेवानिवृत्तांपैकी तीन कर्मचारी हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरित कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उतार वयात या सेवानिवृत्तांच्या जीवाला मोठा धोकाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आता या कर्मचाऱ्यांनी आर या पारचा नारा दिला आहे. कारण दरवर्षी या सेवानिवृत्तांना त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसावे लागते. त्यांचीही हेळसांड पाहता महाराष्ट्र शासनाने दिनांक 19 ऑगस्ट 2024 पासून या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून शासनाच्या वतीने सेवानिवृत्ती देण्यात येणार आहे. ती मिळेल त्यावेळेस मिळेल परंतु नियमित मिळणारे सेवानिवृत्ती जिल्हा परिषदेने थांबविल्यामुळे या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. आज या उपोषणामध्ये या समितीचे संस्थापक अध्यक्ष फकिरा वाघ, जिल्हाध्यक्ष सुधीर पैठणकर, जिल्हा सचिव मनोहर कार्लेकर, कार्याध्यक्ष सुनील साळुंखे, अरुण पगारे, दिलीप देशपांडे, के. ए. अवघड ,सारंगधर राऊत आदी सेवानिवृत्तांची उपस्थिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.