जालना -जालन्याच्या तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंगल राजू गायकवाड -धुपे यांनी अखिल भारतीय माहिती कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनीष गोविंदराव भाले यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. श्रीमती धुपे या सध्या वाशिम येथे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान या संदर्भात बोलताना या प्रकरणातील आरोपी तथा माहिती अधिकार कार्यकर्ता मनीष भाले यांनी सांगितले की, “शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांची अपसंपदे विषयीची सर्व माहिती माहिती अधिकारात उघड केलेली आहे. तसेच दिनांक आठ जुलै रोजी राज्यपाल यांच्याकडे श्रीमती धुपे यांनी 17 कोटींची अपसंपदा जमवल्याची तक्रार केली आहे त्यासोबत सर्वोच्च न्यायालयाचा दिनांक 17 फेब्रुवारी 2025 च्या कर्नाटक राज्यविरुद्ध सुधाकर रेड्डी यांच्या याचिकेचाही संदर्भ जोडला आहे.तो राग मनात धरून त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच यापूर्वीच्या अशा प्रकरणामधील सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेऊन कार्यालय आपल्यावर कारवाई करेल आणि कदाचित राज्यपालांनी देखील तसे आदेश दिले असावेत, असा समज शिक्षणाधिकाऱ्यांचा झाला असावा. तसेच तसे झाले नाही तर मी न्यायालयाचा अवमान केला प्रकरणी या सर्वांना न्यायालयात ओढण्याच्या भीतीने हा खोटा गुन्हा दाखल केला आहे. माझ्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्या प्रकरणाचा कुठेतरी भ्रम आणि विसर पडावा हा देखील यामागे उद्देश असल्या उद्देश आहे.“(व्हिडीओ पहा)
श्रीमती मंगल धुपे यांनी दिनांक 29 रोजी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ,”दिनांक 14 जुलै 2025 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मी आणि खाजगी वाहन चालक संदीप रत्नपारखे घरी बसलो होतो. त्यावेळी माझ्या ओळखीचा मनीष गोविंदराव भाले राहणार भाग्यनगर जुना जालना हा घरी आला आणि तुमची बदली झाली आहे परंतु माझ्या काही प्रस्तावावर मागील तारखे मध्ये सह्या करून देण्याची मागणी करू लागला. अशा सह्या करण्यासाठी मी नकार दिल्यानंतर त्याने, मी अखिल भारतीय माहिती कार्यकर्ता महासंघाचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे तुम्ही जर सही नाही केली तर मी सर्व संघटना तुमच्या मागे लावून देईल. तुम्ही बदलून गेल्यानंतर तुमची सर्व माहिती कार्यालयातून घेतली आहे. त्यामुळे तुमचे धीडवडे निघतील ,तसेच यापूर्वी तुम्ही मला कार्यालयातून हाकलून दिले होते त्याचा हा बदला समजा. एवढेच नव्हे तर मी शिक्षण आयुक्तांकडे तुमच्या अपसंपदाची माहिती दिली आहे .हे सर्व प्रकरण थांबवायचे असेल तर मला 25 लाख रुपये द्या नाहीतर मी वृत्तपत्रांमध्ये आणि सोशल मीडियावर हे सर्व प्रकरण टाकून बदनामी करेल .असे अशी धमकी देऊन तो निघून गेला”. दरम्यान श्रीमती मंगल धुपे या दिनांक 23 फेब्रुवारी 2022 ते दिनांक नऊ जून 2025 पर्यंत जालना जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्यांची बदली वाशिम येथे शिक्षणाधिकारी म्हणून झालेली आहे . परंतु त्या सध्याअंबड रस्त्यावर असलेल्या भाग्योदय नगर येथे राहत आहेत. श्रीमती धुपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात मनीष गोविंदराव भाले राहणार भाग्यनगर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 308 आणि 351 अन्वये गुन्हा दाखल करण्यात केला आहे .कलम 308 म्हणजे एखाद्या व्यक्तीला इजा किंवा मृत्यूची भीती दाखवून त्याच्याकडून वेगवेगळ्या स्वरूपात मालमत्तेची मागणी करणे.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
*दिलीप पोहनेरकर * ९४२२२१९१७२