जालना- एका विश्वस्त मंडळाची कार्यकारी बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करून सरकार दरबारी नोंद करण्यासाठी पैसे मागणारा सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडला आहे.
मौजे देवपिंपळगाव येथील श्री.भैरवनाथ मंदिर विश्वस्त मंडळाची कार्यकारणी बदलली आहे आणि या बदलाची नोंद सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे करण्यासाठी या कार्यालयातील निरीक्षक धरमसिंग भाऊसिंग जंजाळे वय 45 वर्ष याने या प्रकरणातील तक्रारदाराकडे वीस हजार रुपयांची लाच दि 17 रोजी मागितली. परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक 17 मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली.दरम्यान या 20 हजारांपैकी दहा हजार रुपये काम होण्यापूर्वी आणि दहा हजार रुपये काम झाल्यानंतर असे देण्याचे ठरले आणि पंचा समक्ष हा व्यवहार झाला. त्यानुसार आज दिनांक 23 मे रोजी विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना धरमसिंग भाऊसिंग जंजाळे वर्ग 3 च्या या निरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे यांच्या पथकातील सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संजय मुटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com