छत्रपती संभाजी नगर- एका कामासाठी लाच म्हणून घेतलेले 35 लाख रुपये पचविल्यानंतर पुन्हा त्याच गरजू व्यक्तीकडून पैसे उकळण्याची लालूच वाढली आणि यामधून पुन्हा पैशाची मागणी झाली. 18 लाखांमध्ये ठरलेला दुसरा सौदा पाच लाखांच्या लाचेमुळे उघडकीस आला आणि सगळच अपचन झालं. छत्रपती संभाजी नगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोलकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यासोबत त्यांचा एका सहकाऱ्याला देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. एवढेच नव्हे तर उपजिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयातून रोख पंच्याहत्तर हजार रुपयांची रोकडही जप्त केली आहे.
▶️ तक्रारदार =पुरुष वय 49 वर्ष , राहणार -छत्रपती संभाजीनगर▶️आरोपी =1)श्री दिपक त्रिभुवन वय 40 लोकसेवक – महसूल सहाय्यक, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर ( वर्ग 3)
2)श्री विनोद गोंडुराव खिरोळकर वय 51वर्षे,निवासी उप जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर (वर्ग 1)
▶️तक्रारीचे स्वरूप =तक्रारदार यांनी व त्यांच्या पार्टनर यांनी मौजे तिसगाव, छ. संभाजीनगर येथील 6 एकर 16 गुंठे जमीन ही वर्ग 2 ची असल्याने सदर जमीन शासनाची परवानगी घेऊन सर्व नियमानुसार रजिस्टरीं खरेदी खत करून सन 2023 मध्ये विकत घेतली आहे.सदर जमीन ही वर्ग 2 ची असल्याने ती खरेदी करण्यासाठी शासनास लागणारे चलन जेनरेट करून देण्यासाठी अलोसे 1 व 2 यांनी 23 लाख रुपये मागणी करून या पूर्वी तक्रारदार यांचे कडून 23 लाख रुपये घेतलेले आहे.
सदर जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1मध्ये करण्यासाठी नजराणा शासनास पुन्हा भरावयाचा असल्याने त्या साठी लागणारे चलन पुन्हा जनरेट करून देण्यासाठी आलोसे हे तक्रारदार व त्यांचे पार्टनर यांचे कडे लाच म्हणून 18लाख रुपये ची मागणी करीत होते अशी तक्रार दि 23/05/2025 रोजी दिली▶️पडताळणी =दि 23/05/25 रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान अलोसे श्री त्रिभुवन यांनी, निवासी उपजिल्हाधिकारी साहेबांनी 18 लाख रुपये सांगितले आहे.दि 26/05/25 रोजी लाच मागणी पडताळणी केली असता निवासी उप जिल्हाधिकारी यांचे केबिन मध्ये तक्रारदार, अलोसे विनोद खिरोळकर, अलोसे त्रिभुवन यांच्यात लाच रकमे बाबत बोलणे झाले व 5 लाख रुपये पहिले व फाईल कंम्लेट झाल्यावर फायनल पेमेंट 13 लाख रुपये रकम देण्याचे ठरले .
▶️सापळा कारवाई =दि 27/05/25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर नगर समोरील रोडवर आलोसे क्र 1.त्रिभुवन यांनी बोलावल्ल्या प्रमाणे सापळा कारवाईचे नियोजन केले असता तक्रारदार व तक्रारदार यांचे पार्टनर व पंच साक्षीदार यांचे सह थांबले असताना आलोसे हे सदर ठिकाणी आले व तक्रादार यांचे कडून 5 लाख
रुपये लाच रकम स्वीकारताच आलोसे यास ताब्यात घेतले आहे
अलोसे श्री विनोद खिरोळकर यांना स्वतंत्र टीमने लागलीच ताब्यात घेतले आहे▶️दि 27/5/25रोजी सापळा कारवाई मध्ये आलोसे त्रिभुवन यांनी 5 लाख रुपये लाच रक्कम स्वीकारली आहे▶️घरझडती =अलोसे यांची घरझडती प्रक्रिया चालू आहे
▶️ सिटीचा चौक स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे
*इतर माहिती*
आलो से क्रमांक 1 दीपक मधुकर त्रिभुवन, महसूल सहाय्यक, आर डी सी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी नगर,
अलोसे क्रमांक 2. श्री विनोद खिरोळकर, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी तक्रारदार व त्यांचे पार्टनर यांना यांनी मौजे तिसगाव छत्रपती संभाजी नगर येथील गट नंबर 225/5 मध्ये 6 एकर 16 गुंठे ही वर्ग 2 ची जमीन शासनाच्या परवानगीने सर्व नियमानुसार रजिस्ट्री खरेदीखत करून सन 2023 मध्ये विकत घेतलेली आहे सदर जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्यासाठी शासनास पुन्हा नियमानुसार चलन वाढवायचे असल्याने त्यासाठी लागणारे चलन जनरेट करून देण्यासाठी श्री खिरोळकर यांनी तक्रारदार व त्यांचे पार्टनर यांच्याकडून 18 लाख रुपयांची लाच मागणी केली होती व अलोसे त्रिभुवन यांनी साहेबांशी बोलून तडजोड करून काही कमी होईल का याबाबत बोलणी करू व दिनांक 26/05/ 25 रोजी आलोसे क्रमांक एक व दोन यांनी तक्रारदार यांच्याकडे ठरल्याप्रमाणे लाच रक्कम 18 लाख मागणी करून त्यापैकी 5 लाख रुपये पहिल्यांदा व फाईल कंप्लेंट झाल्यानंतर बाकी राहिलेली लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून दिनांक 27 /5 /25 रोजी आलोसे श्री त्रिभुवन यांनी तक्रारदार यांचे कडून जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी नगर समोर रोडवर पाच लाख रुपये लाच रक्कम स्वीकारताना पकडण्यात आली आहे म्हणून आलो असे क्रमांक एक व दोन यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 , 7अ ,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सिटी चौक पोलीस स्टेशन छत्रपती संभाजी नगर शहर या ठिकाणी सुरू आहे .➡️ आरोपींची अंगझडती आरोपी क्र .1 याचे कडे एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि तीन हजार रुपये रोख रक्कम.
आरोपी क्र. 2 याचे कडे एक आयफोन 15 प्रो मॅक्स कंपनीचा मोबाईल. व त्यांचे केबिन मध्ये 75000/रुपये रोख रक्कम मिळून आली.
https://youtube.com/@edtvjalna5167?si=Au7f6C5RR3ANSPeH
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर
९४२२२१९१७२