Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » अकरावी साठी पात्र आहात; मिळवा संरक्षण सेवेत संधी
    Breaking News

    अकरावी साठी पात्र आहात; मिळवा संरक्षण सेवेत संधी

    EdTvBy EdTvDecember 30, 2021Updated:December 30, 2021No Comments3 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

     औरंगाबाद-राज्यातील अधिकाधिक  विद्यार्थ्यांना संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून जास्तीत जास्त संख्येने जाता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने सन 1977 मध्ये औरंगाबाद येथे मुलांसाठीची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. आपल्या देशाच्या सेवेसाठी आज पर्यंत साडेपाचशे पेक्षा अधिक विद्यार्थी संरक्षण दलातील विविध विभागात अधिकारी म्हणून या संस्थेच्या माध्यमातून मिळाले आहेत. दरवर्षी हजारो विद्यार्थी या संस्थेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी संस्थेव्दारे घेण्यात येणारी पात्रता परिक्षा देतात. यातील गुणवत्ता यादीनुसार साधारण तीनशे विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येवून छाननी अंती केवळ 60 विद्यार्थ्यांची  या प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. त्यानंतर दोन वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर विद्यार्थी  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी  (एन.डी.ए)  साठी प्रवेशास पात्र ठरतो आणि सोबतच परिक्षा पास होण्याचीही शक्यता वाढते. पुढील वर्षाच्या प्रवेशासाठीहि या संस्थेकडून राज्यभरातून  सैनिकी सेवापूर्व शिक्षण 46 व्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना दि.24 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज दाखल करता येईल.

     पात्रता- या  प्रशिक्षणासाठी अर्ज करणारा उमेदवार हा अविवाहित मुलगा असावा. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा, त्याचा जन्म 02 जानेवारी 2006 ते 31 डिसेंबर 2007 च्या दरम्यान झालेला असावा. तर मार्च / एप्रिल / मे 2022 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेला बसणारा असावा. म्हणजेच जून 2022 मध्ये इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा. तसेच उमेदवार हा सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा. यूपीएससी ने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, पुणे (एन.डी.ए) आणि भारतीय नौसेना प्रबोधिनी, एझिमला, केरळ (आय.एन.ए.) येथील प्रवेशासाठी निश्चित करण्यात आलेल्या शारिरीक निकषास पात्र असावा. हे निकष यूपीएससी तथा सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबादच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवाराची उंची 157 सेंटीमीटर., वजन 43 किलोग्रॅम, कमीत कमी छाती न फुगवता-74 सेंटीमीटर, फुगवून-79 सेंटीमीटर, रातांधळा किंवा रंगांधळेपणा नसावा, चष्मा (-) 2.0 D पेक्षा जास्त नसावा.

    सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था औरंगाबाद यांच्याकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत यांच्याद्वारे केली जाते. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी  माध्यमातून 13 फेब्रुवारी 2022 रोजी विविध केंद्रावर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत 150 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न असतील. त्यामध्ये गणिताचे 75 आणि सामान्य ज्ञानावर 75 गुण आधारित असतील. लेखी परीक्षा साधारणतः  इयत्ता 8 वी ते 10 वी च्या स्टेट बोर्ड व सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रत्येक योग्य उत्तराला 1 गुण मिळेल व प्रत्येकी चुकीच्या उत्तराला 0.5 गुण वजा केले जातील. तसेच यशस्वी परीक्षार्थींना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. पात्र उमेदवाराची मुलाखत प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येतील.

    तेव्हा इच्छूक उमेदवारांना www.spiaurangabad.com या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करता येईल. परीक्षा शुल्क रु.450 ऑनलाईन फक्त क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, किंवा नेट बँकींग इत्यादी द्वारे भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलान द्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्ती नुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होईल. तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख    24 जानेवारी 2022 सायं.6.00 वाजेपर्यंत असणार आहे. उमदेवारांना परीक्षेचे हॉल तिकीट दि.07 फेब्रुवारी 2022 रोजी संस्थेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. परीक्षा संबंधीत सूचनांसाठी वेळोवेळी www.spiaurangabad.com  या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन औरंगाबाद, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचे संचालक अमित दळवी कर्नल (निवृत्त) यांनी केले आहे

    मुलांप्रमाणेच मुलीही देश सेवेची संधी मिळण्यास पात्र होण्यासाठी  या संस्थेप्रमाणेच मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था असावी या मागणी चा सकारात्मक विचार करून  औरंगाबादच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या धर्तीवर नाशिक येथे महिलांसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी  नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीही गठित करण्यात आली आहे. 

    .(रेखा पालवे)

    माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,

    मराठवाडा विभाग, औरंगाबाद.

    *edtv news, jalna,9422219172*

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    dio edtv jes collage rekha palwe संरक्षण सेवा
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleअवघ्या १० वर्षीय काव्य अग्रवालचा विश्वविक्रम; ठरला भगवद्गीता लिहणारा सर्वात छोटा लेखक
    Next Article आज पुन्हा मोकाट कुत्र्यांचा बालकावर हल्ला
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    July 1, 2025

    थेट आषाढी वारी मधून….

    June 29, 2025

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    June 28, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,061 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,183 Views

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    June 21, 2025909 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025804 Views
    Don't Miss
    Breaking News July 1, 2025

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    जालना- https://youtu.be/Oypqas1EimE?si=3910mOIlPf-vNMdG

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.