Jalna Districtजालना जिल्हा

जागतिक हिवताप आणि आंतरराष्ट्रीय जंतनाशक दिन विविध उपक्रमांनी साजरा

जालना- आरोग्य क्षेत्रातील दोन विशेष दिवस आज एकत्र साजरे करण्यात आले आंतरराष्ट्रीय जंतनाशक दिन आणि जागतिक हिवताप दिन असे हे दोन विशेष दिवस आहेत.

 

या दिनाच्या निमित्ताने सकाळी दहा वाजता गांधीचमन येथून परिचारिकांची एक विशेष फेरी काढण्यात आली होती तत्पूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विवेक खतगावकर यांनी उपस्थितांना शपथ दिली आणि या फिरायला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले रेल्वे स्थानकापासून परत स्त्री रुग्णालयात या फेरीचा समारोप झाला.

यानंतर हिवताप दिनाच्या निमित्ताने चित्रप्रदर्शन आणि परिचारिकांनी रांगोळीच्या माध्यमातून माध्यमातून साकारलेल्या विशेष संदेशाचे उद्घाटन महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळीडॉ.राहुल राऊत जिल्हा हिवताप अधिकारी,महेंद्र वाघमारे, आरोग्य कर्मचारी, राजु रसाळ,श्रीमती सुनिता रायपुरे प्राचार्य परिचर्या प्रशिक्षण केंद्र ,दिपा साळवे, हिवताप कार्यालयातील कर्मचारी व जालना शहरातील नागरिक हजर होते.

आंतरराष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. आणि एक ते 19 वर्षापर्यंत च्या लाभार्थ्यांना रक्तक्षय होऊ नये यासाठी जंतनाशक औषधी देण्यात आली आहे. परिचारिका सुनीता भाले आणि कुसुम सोळंके हे या जंतनाशक मोहिमेची जबाबदारी पार पाडत आहेत.

दरम्यान विशेष संदेश देणाऱ्या रांगोळ्याना गुणानुक्रमे पारितोषिकेही जाहीर करण्यात आली आहेत. दि. 12 मे रोजी परिचारिका दिनानिमित्त ते प्रदान केले जाणार आहेत.

*बातमी अशी;  जिच्यावर  तुम्ही ठेवणार विश्वास!*
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर* ९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.