Jalna Districtखेळ

दुसऱ्या दिवशी 81 विद्यार्थ्यांनी दिली क्रीडा नैपुण्य चाचणी

जालना- आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट कंपनी पुणे यांनी डायव्हिंग, अथलेटिक्स, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिफ्टिंग, या क्रीडा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळाडू तयार करण्यासाठी क्रीडा नैपुण्य चाचणी चे आयोजन केले आहे.

 

9 ते 13 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आहे .आज दुसऱ्या दिवशी 81 विद्यार्थ्यांनी ही क्रीडा नैपुण्य चाचणी दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी सकाळी दहा वाजता जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आधार कार्ड घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांनी केले आहे. या चाचणीत निवड झाल्यानंतर पुन्हा एक चाचणी राज्यस्तरावर होईल आणि त्यामधून आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांची निवड केल्या जाईल .इथे निवड झाल्यानंतर पुढील शिक्षण, राहणे आणि निवडलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूला तयार करणे ही सर्व जबाबदारी ही आर्मी स्पोर्ट्स इंस्टिट्यूट पुणे यांची असणार आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य करण्यासाठी ही सुवर्णसंधी असल्याचेही त्या म्हणाल्या-


– दिलीप पोहनेरकर,edtvnews
9422219172

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.