Jalna Districtजालना जिल्हाराज्य

4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार,20 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा

जालना -चार वर्षाच्या मुलीवर खाऊ देण्याचे आमिष दाखवून 12 डिसेंम्बर 2017 ला बलात्कार करणाऱ्या एका आरोपीला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी.गिमेकर यांनी वीस वर्षे सश्रम कारावास आणि एक लक्ष रुपयांचा दंड फोटो ठेवला आहे तसेच दंड न भरल्यास आणखी तीन वर्ष कारावासाची शिक्षाही सुनावली आहे जालना जिल्ह्यात एखाद्या पोस्टच्या प्रकरणात एवढी मोठी शिक्षा ठोठावण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे दरम्यान या दोषारोप पत्राचा निकाल सुनावताना जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी ओठावलेल्या शिक्षेमुळे जालना जिल्हा चांगलाच हादरून निघाला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या नराधमांना धडकी भरणार यात कांही शंका नाही.

या शिक्षेविषयी अधिक माहिती अशी 12 डिसेंबर 2017 रोजी चे हे प्रकरण आहे. या दिवशी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एक चार वर्षाची अल्पवयीन पीडित मुलगी तिच्या भावंडासोबत गल्लीमध्ये खेळत होती. या वेळी प्रकरणातील आरोपी विनोद विक्रम पैठणकर, वय 26 वर्ष, राहणार अशोक नगर जुना जालना याने या मुलीला तिच्या अल्पवयीन भावासह मोटर सायकलवर बसून मुक्तेश्वर तलाव परिसरात घेऊन गेला. दरम्यान मुलीच्या भावाला मुक्तेश्वर तलावापासून काही अंतरावरच सोडून दिले, आणि त्यानंतर पीडित मुलीला तलावाच्या काठावर घेऊन गेला, मुलीच्या पोटावर बुक्क्या मारून तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर पीडित मुलगी आणि तिच्या भावाला पुन्हा गल्लीत आणून सोडले. दरम्यानच्या काळात मुलगी घरी नसल्यामुळे तिचा शोध घेत असताना पीडितेच्या आईने व आजोबाने आरोपीला या बहीण भावंडांना गल्लीत सोडताना पाहिल्यामुळे काही लोकांच्या मदतीने आरोपीला पकडले हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीने सांगितल्यानुसार तिच्यावर बलात्कार झाल्याचे पिढीतेच्या आईच्या लक्षात आले. त्यांनी त्याच दिवशी कदिम जालना पोलीस ठाणे येथे तक्रार दिली या तक्रारीवरून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे (पोस्को) गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला.

सरकार पक्षाच्या वतीने एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने पीडितेची आई, मुलगी, तिची बहीण, गल्लीतील शेजारी, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील जयश्रीबोराडे यांनी काम पाहिले.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.