Jalna Districtजालना जिल्हा

… अन्यथा मी नाराज होईल; आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना ठणकावले

जालना- जालना जिल्ह्यामध्ये आरोग्य क्षेत्रात सुरू असलेला भोंगळ कारभार आणि त्यातून वाढत जाणारे गर्भलिंगनिदान आणि बोगस डॉक्टरांचे प्रमाण याला महिनाभरात आळा घाला, अन्यथा मी नाराज होईल. अशा शब्दात राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालन्या चे पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांना ठणकावले आहे.

खरीप हंगाम आढावा बैठकीनिमित्त्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल, कृषी अधीक्षक रणदिवे ,यांची उपस्थिती होती. आढावा बैठकीत आरोग्य क्षेत्रातील विषयांवर जास्त चर्चा झाली. विशेष करून मागील महिन्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी भोकरदन नाका रोडवर असलेल्या राजुरेश्वर क्लीनिक मधून बोगस डॉक्टर कडून गर्भलिंग निदान करण्याचे साहित्य जप्त करून गुन्हा दाखल केला होता. मात्र हे साहित्य येते कुठून? तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले आहे , औषधी दुकानावर गर्भपाताच्या आणि गुंगीचे, नशेचे “चॉकलेट” उघडपणे मिळत आहेत. या सर्व प्रकाराला पत्रकारांनी उचलून धरले. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना चांगलेच ठणकावले आहे. महिनाभरात हा सर्व प्रकार बंद करा, अन्यथा मी तुमच्यावर नाराज होईल आणि याचे परिणाम तुम्हाला दिसतील अशा भाषेत सर्वांसमक्ष ते म्हणाले.

तसेच जिल्ह्यात बंगाली, मद्रासी ,आणि अन्य डॉक्टरांची महिनाभरा मध्ये तपासणी मोहीम करून या सर्वांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना दिल्या. त्यामुळे आता येणाऱ्या महिनाभरामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि औषधी प्रशासन, आरोग्य क्षेत्रातील या बोगसगिरीवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले असणार आहे.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.