Jalna District

123 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप; जालना एज्युकेशन फाउंडेशन चा मदतीचा हात

जालना-विनम्रता ही खूप मोठी शक्ती आहे. तुम्ही जेवढे विनम्र असाल तेवढे तुमची शक्ती वाढेल. त्याच सोबत तुमच्यामध्ये श्रेष्ठता आहे परंतु ती दुसऱ्याला ओळखू द्या! स्वतःहून जाहीर करू नका. असे मार्गदर्शन औरंगाबाद येथील बजाज ऑटो लिमिटेड सी.एस.आर. चे मुख्य सल्लागार चंद्रप्रकाश त्रिपाठी यांनी केले.

जालना एज्युकेशन फाउंडेशन च्या वतीने १२३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. त्यावेळी वेळी श्री. त्रिपाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून म्हणून ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल, जे.ई.एस. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रामलाल अग्रवाल, जालना एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सुरेश लाहोटी, सचिव सुनील रायठठ्ठा ,सुरेश केसापूरकर आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली.

दरम्यान मार्गदर्शन करताना डॉ. राठोड म्हणाले, की कोणतेही यश संघर्षाशिवाय मिळत नाही. कठोर मेहनत आणि परिश्रम करून यश मिळविल्यानंतर चांगला माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी माणुसकी जपणे हे अत्यंत आवश्यक आहे. जालना एज्युकेशन फाउंडेशन ने होतकरू आणि गरजवंत या दोन घटकांवर भर दिलेला असल्यामुळे त्यांनी दिलेल्या या शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदाल यांनीही विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले “मोठं होणं सोपं नाही, एखाद्याची जबाबदारी वाढली तर त्यामागे त्याला मेहनत देखील तेवढीच करावी लागते, आणि मेहनतही वाढते. यश मिळाल्यानंतर त्या व्यक्तीचे यश सर्वांना दिसते परंतु त्यामागील त्याची मेहनत कोणालाही दिसत नाही. खरंतर त्याने घेतलेल्या मेहनतीमुळेच तो यशाचे शिखर गाठू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संधीचं सोनं करून यशाचे शिखर गाठावे”. असे आवाहनही त्यांनी केले.जालना एज्युकेशन फाऊंडेशनचे सचिव सुनील रायठठ्ठा यांनी विद्यार्थी घडल्यानंतर मिळणारा आनंद काय असतो याबद्दल सांगितले. ते म्हणाले “अनेक देशांमध्ये विनोदराय इंजीनियरिंग चे साहित्य पाठविले जाते, ते पाठवल्यानंतर संबंधित ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करून तेथील कामगारांना प्रशिक्षण देऊन ज्यावेळेस कंपनीची टीम वापस येते त्या वेळेस खरोखर आनंद होतो. आणि अशा प्रकारची मेहनतच आयुष्यामध्ये रंग भरते. त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया म्हणून चालणार नाही तर त्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत, आणि आपणच मेक इन इंडिया का करू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करून यशाचे शिखर गाठावे”. असेही ते म्हणाले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जालना एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सुरेश लाहोटी यांनी केले तर सूत्रसंचालन सुरेश केसापूरकर यांनी केले.

विद्यार्थी गुणवंत असेल आणि केवळ आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर आपणही शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकता. अधिक माहितीसाठी ७०२०५१८७६८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.