Jalna District

माजी विद्यार्थिनीने दिलेल्या देणगी मधून दोन विद्यार्थ्यांना होणारा फायदा

जालना- येथील जे.ई. एस. महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी प्रज्ञा देशमुख या सन १९८१ ते १९८५ दरम्यान या महाविद्यालयात बी. ए. मध्ये शिक्षण घेत होत्या, आणि त्या नंतर त्यांनी पुढील शिक्षण घेऊन इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक म्हणून सध्या पं. जवाहरलाल नेहरु महाविद्यालय औरंगाबाद येथे कार्यरत आहेत. त्यांनी या महाविद्यालयाला ५१ हजार रुपयांची देणगी दिली आहे.

या देणगीच्या व्याजातून दरवर्षी एका विद्यार्थ्याला एक हजार रुपये आणि एका विद्यार्थिनीला पंधराशे रुपये अशी मदत केली जाणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी जवाहर काबरा म्हणाले ,की प्रा. प्रज्ञा देशमुख यांनी आपणही महाविद्यालयाचे काही देणे लागतो या भूमिकेतून त्यांचे वडील देविदास आनंदराव देशमुख हे सिंधी नाथांनी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक होते, आणि इंग्रजी विषयाचे अभ्यासक होते .त्यामुळे प्रज्ञा यांनी दिलेली देणगी ठेव स्वरूपात जमा करून घेतली आहे ,आणि त्यावर येणाऱ्या व्याजातून दरवर्षी देविदास आनंदराव देशमुख यांच्या नावाने बी. ए. तृतीय वर्षाच्या इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यास एक हजार रुपये व प्रमाणपत्र आणि दरवर्षी एका विद्यार्थिनीस पूर्वनिर्धारित निकषांच्या आधारे सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी घोषित करून एक हजार पाचशे रुपये आणि प्रमाणपत्र बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या वतीने देणगी स्वीकारताना प्रशासकीय अधिकारी जवाहर काबरा ,प्रा. शिंदे यांच्यासह प्रा.प्रज्ञा देशमुख यांच्या भगिनी प्रा.डॉ.प्राप्ती देशमुख यांचीही उपस्थिती होती.

*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com
9422219172

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.