Jalna Districtराज्य

प्रज्ञा दया पवार यांना ‘ ‘दुःखी ‘राज्य काव्य तर रेखा बैजल यांना जीवनगौरव पुरस्कार घोषित

जालना – येथील कै. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुप्रसिद्ध उर्दू शायर कै. राय हरिश्‍चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘दु:खी’ राज्य काव्य पुरस्कार डॉ. प्रज्ञा दया पवार यांना जाहीर झाला असून सिद्धहस्त लेखिका रेखा बैजल यांना साहित्य क्षेत्रातील समग्र योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.कवितेचा पाडवा चे संयोजक विनीत साहनी व डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी शनिवारी ( ता. 19) या पुरस्कारांची घोषणा केली.

प्रज्ञा दया पवार

मागील 21 वर्षांपासून प्रसिद्ध उर्दु शायर कै.राय हरिश्‍चंद्र साहनी ‘दुःखी’ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठीतील कवींना त्यांच्या कवितेतील योगदानाबद्दल पुरस्काराने गौरविण्यात येते. 21 हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून येत्या 02 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 06.00 वा. जे. ई. एस.महाविद्यालयाच्या खुल्या सांस्कृतिक सभागृहात गुढीपाडव्याच्या दिवशी रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि मराठी साहित्य विश्वात वेगळेपण जपलेल्या “कवितेचा पाडवा ” या साहित्यिक कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण व सन्मान सोहळा होणार आहे.

                      रेखा बैजल

 

दरम्यान यापूर्वी मराठीतील प्रसिद्ध कवी फ .मुं. शिंदे, भगवान देशमुख, रामदास फुटाणे, लोकनाथ यशवंत, सौमित्र ,अरुणा ढेरे, अनुराधा पाटील ,डॉ.वृषाली किन्हाळकर, इंद्रजीत भालेराव, विष्णू सूर्या वाघ, राजन गवस, कैलास भाले ,श्रीकांत देशमुख, प्रविण बांदेकर अशा मातब्बर कवींना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले . अशी माहिती विनीत साहनी, अभय साहनी, डॉ.संजीवनी तडेगावकर, पंडित तडेगावकर यांनी दिली.

*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com9422219172

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.