Jalna District

रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या फरार आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी पकडले

जालना- रेल्वे स्थानक आणि धावत्या रेल्वेमध्ये विविध प्रकारच्या चोऱ्या करणारा आरोपी अनिल रामा चव्हाण ,25 याला जालन्याचा लोहमार्ग पोलिसांनी पकडण्यात यश मिळविले आहे.

गेल्या पाच वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. परतूर येथे साठे परिसरात राहणारा अनिल रामा चव्हाण हा 25 वर्षाचा तरुण पाच वर्षांपूर्वी रेल्वेमध्ये सराईत गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या रडारवर आला होता. त्यावेळेस पासून पोलीस याचा शोध घेत होते. औरंगाबाद येथे रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये त्यानुसार गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. काल दिनांक 2 जानेवारी रोजी अनिल रामा चव्हाण. आपल्या पत्नीसह परतूर वरून मांगीर बाबाचे यात्रेसाठी औरंगाबाद कडे जात असल्याची माहिती जालना येथील लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोहमार्ग पोलीस कर्मचारी संजय गायकवाड, माधव पवार, महिला कर्मचारी छाया शिंदे, यांनी या आरोपीला जालना स्थानकावर पकडले. त्यांना औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या लहान मुलाला आणि पत्नीला घरी सोडून देण्यात आले आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.