Jalna Districtजालना जिल्हा

मंठ्यात प्रसादासोबत आले 2 पिस्तोल

जालना- पुणे येथून जालना जिल्ह्यात येणाऱ्या बस मध्ये चार जिवंत काडतुसासह दोन गावठी पिस्तूल सापडल्यामुळे क्षणभर बसच्या वाहक चालकांसह पोलिसांच्याही हृदयाचे ठोके चुकले होते, मात्र पोलिसांनी वेळीच या सर्व प्रकाराचा तपास लावून पिस्तूल जप्त केले आहेत, मात्र आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

परतुर आगाराची बस क्रमांक एम एच 20 डी आय 34 79 वल्लभनगर ते परतुर ही बस सोमवारी सकाळी नऊ वाजता पुणे येथून निघाली आणि सायंकाळी सात वाजता मंठा बस स्थानकात आली. यावेळी बस तपासणी करत असताना वाचकांच्या अशा लक्ष असे लक्षात आले की चालकाच्या मागच्या दोन क्रमांकाच्या सीट खाली एक बेवारस पिशवी आहे. याविषयी त्यांनी परतूर आगार प्रमुखांशी संपर्क साधला आणि त्यांच्या सूचनेनुसार मंठा पोलिसांनाही सूचना दिल्या. यावरून मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना या पिशवी विषयी खात्री करण्याचे सांगितले असता या पिशवी मध्ये दोन गावठी पिस्तूल चार जिवंत काडतुसे देव- देवतांचे फोटो, प्रसाद या वस्तू सापडल्या आहेत.

दरम्यान या वस्तू कोणी ठेवल्या हे मात्र समजू शकले नाही पुण्यापासून निघाल्यानंतर या बसला मंठा इथपर्यंत वीस थांबे आहेत. दरम्यान या बसचे वाहक भरत किसनराव कोल्‍हे, वय 42 राहणार गोळेगाव तालुका देऊळगाव राजा, यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंठा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला मुद्देमालामध्ये प्रत्येकी 5000 रुपयांची दोन पिस्तूल आणि एक हजार रुपयांचे चार जिवंत काढतोस असा एकूण अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.सीसीटीव्ही फुटेज पाहत पोलीस गुन्हेगारांचा तपास लावण्याच्या प्रयत्नात आहेत.

****एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button