Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    तहसीलदारांनी वीज कंपनीला केले रस्त्याचे अर्पण!; शेतकरी परिवार करणार तहसीलदारांना देहांच समर्पण!

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » शास्त्रीय संगीताची तहान भागवणारा प.भीमसेन जोशी संगीत महोत्सव
    Jalna District

    शास्त्रीय संगीताची तहान भागवणारा प.भीमसेन जोशी संगीत महोत्सव

    EdTvBy EdTv21/03/2022Updated:21/03/2022No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- कलाश्री संगीत मंडळ पुणे आणि संस्कृती मंच जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जालन्यात दोन दिवसीय भारतरत्न “पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव 2022” आयोजित करण्यात आला होता. रविवार दिनांक 20 रोजी या महोत्सवाचा समारोप झाला. दोन दिवस संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी आपली हजेरी लावून सेवा दिली.

    दुसऱ्या दिवशीच्या संगीत महोत्सवांमध्ये सौ. संपदा दाभाडकर यांनी राग पुरिया धनश्री आणि भावगीत सादर केले. त्यांना संवादिनीवर डॉ. प्रमोद देशपांडे आणि तबल्यावर सुरेश देशपांडे यांनी साथ संगत दिली.

    गेल्या 14 वर्षांपासून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असलेल्या तसेच संगीत विशारद आणि संगीत अलंकार पदवी प्राप्त पंडित सुधाकर चव्हाण यांनीही आपले शास्त्रीय गायन सादर केले. त्यांना साथ दिली ती हार्मोनियम वर यश खडके तबल्यावर सचिन पावगी, तानपुऱ्यावर शाश्वती चव्हाण तर ताल वाद्यावर संभाजीराव यांनी संगत दिली.

    फक्त भारतातच नव्हे तर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, मध्ये आपल्या संगीताची भुरळ घालणाऱ्या व्हायोलिन वादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी सादर केलेले व्हायोलिन वादन रसिकांची दाद घेऊन गेले .पं उपाध्ये यांना आकाशवाणी, दूरदर्शन, आणि विविध संस्थांकडून गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या हस्तेही त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यांना तबल्यावर मुकेश जाधव तर व्हायोलिनवर अमन वरखेडकर यांनी साथ संगत दिली.

    दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या संगीत महोत्सवामध्ये संगीत रसिकांची तहान काही अंशी का होईना शमविण्यामध्ये पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाची मदत झाली म्हटले तर वावगे ठरणार नाही.

    *दिलीप पोहनेरकर*९४२२२९७२
    www.edtvjalna.com

     

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    dabhadkar edtv niramay m p. bhimsen joshi saakshi. m
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleम.बसवेश्वर प्रतिष्ठान च्या कार्यक्रमात रस्ते वाहतूक आणि प्लास्टिक संकलन विषयी जनजागृती
    Next Article दारू का दिली नाही? म्हणून हाणामारी
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    तहसीलदारांनी वीज कंपनीला केले रस्त्याचे अर्पण!; शेतकरी परिवार करणार तहसीलदारांना देहांच समर्पण!

    28/06/2026

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    24/06/2026

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/2026
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,106 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,130 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,155 Views

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    24/06/20261,735 Views
    Don't Miss
    Breaking News 28/06/2026

    तहसीलदारांनी वीज कंपनीला केले रस्त्याचे अर्पण!; शेतकरी परिवार करणार तहसीलदारांना देहांच समर्पण!

    जालना-सरकारी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे गेल्या 13 वर्षांपासून बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथील शेतकरी तहसील कार्यालयात चक्कर मारून…

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    जि.प.च्या गटशिक्षणाधिकाऱ्याला वाढीव वर्गाची “एलर्जी”?

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    तहसीलदारांनी वीज कंपनीला केले रस्त्याचे अर्पण!; शेतकरी परिवार करणार तहसीलदारांना देहांच समर्पण!

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    सहकाऱ्यांची पिळवणूक पहावेना; डॉक्टरांनीच केले ठिय्या आंदोलन

    07/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.