Jalna Districtजालना जिल्हा

ढोल, ताशे, भजनी मंडळी, गोंधळी, आणि परशुरामांच्या जय जय कार

जालना- भगवान श्री परशुराम यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक 3 रोजी अक्षय तृतीयेला जालना शहरातून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या.

कचेरी रोडवरील बालाजी मंदिरापासून वेदमूर्ती सुनील कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली तर पाठक मंगल कार्यालयापासून ऍड. सूनील किनगावकर यांच्या अध्यक्षतेखाली या मिरवणुका काढण्यात आल्या. दरम्यान या मिरवणुकांमध्ये ढोल ,ताशे, फटाक्यांची आतिषबाजी, भजनी मंडळी, महिला मंडळ, गोंधळी यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या मिरवणुकांमध्ये महिलांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. मस्तगड येथे मंमादेवीच्या महाआरतीने या मिरवणुकीचा समारोप झाला.

आणखी ताज्या बातम्या पहाण्यासाठी
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.