Jalna District

शेतकरीही बनू शकतील आता उद्योजक, केंद्र शासनाची नवीन योजना

 जालना-केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पुरस्कृत “  प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना”  केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातंर्गत वर्ष 2020-21 ते 2024-25 या कालावधीत राबवली असुन वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये 10 लाख अनुदान मिळणार आहे आणि ऑनलाईन अर्ज PMFME  योजनेच्या  https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर करायचे आहे.

 शेतकरी उत्पादन गट किंवा संस्था किंवा कंपनी, स्वयंगट, उत्पादन सहकारी संस्था किंवा कंपनी, प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के अनुदान मिळणार आहे. तसेच या योजने अंतर्गत सामाईक पायाभुत सुविधा केंद्राकरीता 35 टक्के अनुदान आणि ब्रंडीग व मार्केटिंगसाठी 50 टक्के अनुदान, स्वयं सहाय्यता गटांनी बीज भांडवल, लहान उपकरणे खरेदी करीता रुपये 40 हजार प्रती सभासद 4 लाखापर्यंत लाभ मिळेल. ही योजना “एक जिल्हा एक उत्पादन” या आधारवर राबवणे सुरॅ आहे. जालना जिल्हा मोसंबी फळबाग उत्पादनामध्ये राज्यात अग्रेसर आहे. त्यामुळे PMFME योजनेअंतर्गत जालना जिल्ह्याचे “एक जिल्हा एक उत्पादन” म्हणुन मोसंबी पिकाची निवड झाली आहे

      या योजनेमध्ये वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक, शेतकरी उत्पादन गट किंवा संस्था किंवा कंपनी, स्वयं सहाय्यता गट, शेतकरी गट, उत्पादन सहकारी संस्था किंवा कंपनी, शासन यंत्रांना आणि खाजगी उद्योग इत्यादी लाभ घेऊ शकतात. जालना जिल्ह्यातील लाभार्थ्यांना “एक जिल्हा एक उत्पादन” आधारावर मोसंबी प्रक्रिया उद्योगच नवीन सूक्ष्म खाद्य उद्योग उभारता येईल. तसेच सध्या कार्यरत असलेले सूक्ष्म खाद्य उद्योगाची क्षमता किंवा अद्यावत किंवा स्तर वृध्दी केले जाईल उदा. भाजीपाला आणि फळे यांची क्लीनींग, वॅक्सींग, पॅकींग ग्रेडींग उद्योग इत्यादी समावेश होतो. व्दितीय प्रक्रिया उद्योग उदाहरण भाजीपाला आणि फळे यांची कमीत कमी प्रक्रिया उद्योग आणि ज्यूस बनवणे, कडधान्य आणि तृणधान्य यांचे पीठ किंवा मुरमुरे, पोहा बनवणे आणि पशु व पक्षी खाद्य प्रक्रीया, तेल बियापासुन तेल काढण्याचा उद्योगाचा समावेश होतो. तसेच तृतीय प्रक्रीया उदा. बेकरी, मसाले, नमकीन, चिवडा, लोणचे, चकली, पापड, सोयापदार्थ, केळी आणि बटाटा चिप्स, नुडल्स, दुधजन्य पदार्थ, मासजन्य पदार्थ, वन उत्पादित खाद्य प्रक्रिया पदार्थ, आळंबीयुक्त पदार्थ, ड्रायफ्रुटसयुक्त पदार्थ, जाम, जेली,मार्मालेड, ज्यूस, बिस्कीट, कँडी, टोमॅटो केचप, भाजीपाला आणि फळे यांची पावडर आणि त्यापासुन तयार केलेले पदार्थ, ऊसापासु गुळ आणि आवळा कँडी आणि इतर खाद्य पदार्थ उद्योग इत्यादी. प्रक्रिया उद्योग लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ वैयक्तिक, शेतकरी उत्पादन गट किंवा संस्था किंवा कंपनी, सव्यंगट, उत्पादन सहकारी संस्था किंवा कंपनी यांनी PMFME च्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन लाभ घ्यावा आणि योजने संदर्भात अधिक माहितीसाठी या कार्यालयाचे जिल्हा संसाधन व्यक्तीस संपर्क करण्याचे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,  केले आहे.

edtv news,9422219172

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.