Jalna Districtजालना जिल्हा

अंगणामध्ये पुरून ठेवलेले दागिने आरोपीने पोलिसांना दिले काढून

जालना- शहरातील रुक्मिणी गार्डन परिसरात सुरेश मगरे यांच्या घरी तीन दिवसांपूर्वी चोरी झाली होती या चोरी प्रकरणातील चोर शोधण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलिसांना यश आले आहे.

देऊळगाव राजा येथील हा आरोपी असून त्याने चोरी केल्याची कबुली दिली आणि चोरी मध्ये लंपास केलेले दागिने त्याच्या घराच्या अंगणातच पुरून ठेवले होते ते देखील पोलिसांना काढून दिले आहेत. 41 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला असताना आरोपींकडून सद्यपरिस्थितीत फक्त बारा लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले आहे.

उर्वरित मुद्देमालाचा शोध पोलीस घेत आहेत. चार दिवसांपूर्वी 41 लाखांची घरफोडी झाल्यामुळे उच्चभ्रू वस्तीमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते आणि पोलिसांना देखील एक मोठे आव्हान मिळाले होते. त्या अनुषंगाने सदर बाजार पोलिस आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी वेगवेगळी पथके स्थापन केली होती. आरोपीचा शोध घेत असताना हा गुन्हा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे राहत असलेल्या राजू शामराव सुरासे याने केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी देऊळगाव राजा येथे जाऊन त्याच्या घरी छापा मारला. सुरासे पळून जाऊ लागला मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि सखोल चौकशी केली असता त्याने दिनांक 21 रोजी जालना मध्ये येऊन उच्चभ्रू वस्तीमध्ये रेकी केली आणि ही रेकी करत असताना सुरेश मगरे यांच्या घराला कुलूप दिसले. त्यामुळे त्याने त्याच्या एका साथीदारांसह रात्री मगरे यांच्या घराच्या मागच्या बाजूने येऊन बेडरूमचे दार तोडले आणि घरात प्रवेश केला. दरम्यान आरोपीने चोरलेल्या मुद्देमालाविषयी अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या अंगणात पुरून ठेवलेला 730 ग्राम वजनाचा तीन लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हवाली केला .उर्वरित मुद्देमालासाठी पोलिसांनी खाक्या दाखविताच देऊळगाव राजा येथील पद्मावती ज्वेलर्सचे मालक सुजीत भाऊलाल सावजी,41 यांना तो भेटला, त्याने चोरीचे दागिने आहे तसेच सांगितले होते त्यामुळे या दागीन्याचे सुरासे यांनी लगड करून घेतली आणि ते मी विकत घेतले अशी कबुली सोनार सुजित सावजी याने दिली आहे. 18 तोळे वजनाची नऊ लाख रुपये किंमतीची लगड आहे. दोन ठिकाणाहून बारा लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे परंतु चोरी मध्ये 41 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्यामुळे उर्वरित मुद्देमाल कुठे लपून ठेवला? याचा पोलीस तपास लावत आहेत. दरम्यान या प्रकरणांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दोन चोर दिसत आहेत त्यापैकी एक राजू शामराव सुरासे आणि अन्य एकाचा शोध पोलीस घेत आहेत. राजू सुरासे आणि सोनार सुजित सावजी या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे आणि पुढील तपास करत आहेत.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.