Jalna District

वयाची निवृत्ती असू शकते,पण मनाने निवृत्त होवू नये – लेखिका रैखा बैजल

निवृत्त मुख्याध्यापक श्रीरंग बोन्द्रे यांचा कार्यगौरव सोहळा

जालना –वयाची निवृत्ती असू शकते,पण मनाने निवृत्त होवू नये,जे जे सकारात्मक सुंदर असते याचा ध्यास घेता आला पाहिजे,असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका रेखा बैजल यांनी आज  केले.शहरातील टाऊन हॉल परिसरातील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जालनातर्फे शिक्षण क्षेत्रातील जाणकार, अभ्यासक निवृत्त मुख्याध्यापक श्रीरंग राधाकृष्ण बोन्द्रे यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पणनिमित्त  कार्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्य गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक प्रा.बसवराज कोरे हे होते.या वेळी लेखिका रेखा बैजल, साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डाॅ.सुहास सदाव्रते,प्रमुख कार्यवाह आर.आर.जोशी,कोषाध्यक्ष संतोष लिंगायत,डाॅ.अंजली भालेराव,मंजूषा भोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रसिद्ध लेखिका रेखा बैजल यांच्या शुभहस्ते निवृत्त मुख्याध्यापक एस.आर.बोन्द्रे यांचा कार्य गौरव करण्यात आला. सन्मान चिन्ह, कार्य गौरव पत्र,शाल,पुष्पगुच्छ यथोचित गौरव करण्यात आला.कार्यक्रमात बोलताना लेखिका बैजल म्हणाल्या की, आजच्या परिस्थितीत शिक्षक हा समाजाला योग्य दिशा देणारा असावा,असे सांगून मुख्याध्यापक बोन्द्रे यांच्यातील अनुभव संपन्नता युवकांना दिशा देणारी आहे,अशा दातृत्वाचा आदर्श युवकांनी घ्यावा असे सांगितले.सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक बोन्द्रे म्हणाले की,आयुष्यात पहिल्यांदाच असा वाढदिवस साजरा होत असतानाच नम्रपणे कृतज्ञता व्यक्त करतो, असे भावोद्गार काढले.अध्यक्षीय समारोपात बोलताना जेष्ठ साहित्यिक प्रा.बसवराज कोरे यांनी मुख्याध्यापक बोन्द्रे यांनी केलेल्या विविध क्षेत्रातील कार्याचा उल्लेख करीत आजच्या परिस्थितीत आदर्श पिढी घडविणारे शिक्षक समाजाला दिशा देणारे असतात असे सांगितले.
कार्यक्रमात काजळा ( ता.बदनापूर) येथील अभ्यासिकेसाठी विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेचे पुस्तके,शालेय विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप, गरजू महिलांना किराणा सामान कीटचे वितरण बोन्द्रे परिवार आणि मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमात दुर्गा संगीत साधना विद्यालयाचे संचालक गजानन गोंदीकर, आनंद काळे,सुयोग सदाव्रते, आर्या गोंदीकर,प्रांजल माजलगावकर यांच्या संचाने स्वागतगीत सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कथामालेचे प्रमुख कार्यवाह आर.आर.जोशी यांनी केले.कार्य गौरव पत्राचे वाचन डाॅ.सुहास सदाव्रते यांनी केले.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डाॅ.दिगंबर दाते यांनी केले. कोषाध्यक्ष संतोष लिंगायत यांनी आभार मानले.कार्यक्रमास उद्योजक शिवकुमार बैजल,डाॅ.सचिन भालेराव, संजय भोकरे,डाॅ.यशवंत सोनुने, प्रा.एम.जी.जोशी, गटशिक्षणाधिकारी रवी जोशी,विनोद वीर,पवन कुलकर्णी,संदीप इंगोले, मुख्याध्यापक देशमुख,रामदास कुलकर्णी यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती.

*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.