Jalna District

न्यास नोंदणी कार्यालयाची सहा कोटींची सुसज्ज इमारत; उद्या स्थलांतर

जालना- आत्तापर्यंत किरायाच्या किंवा दुसऱ्यांच्या इमारतीमध्ये सुरू असलेले येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय उद्या स्वतःच्या इमारती मध्ये जात आहे. आत्तापर्यंत टोकड्या जागेत, तुटक्या फर्निचर मध्ये असलेले हे कार्यालय आता एकदम सुसज्ज आणि भव्यदिव्य इमारतीमध्ये हे स्थलांतरित होत आहे. जालना जिल्ह्यासाठी ही एक नाव लौकिकाची बाब आहे. उद्या(दि.12) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे.

या कार्यक्रमासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती धर्मादाय संघटनेचे चंद्रकांत भडंग, विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री कु, आदिती सुनील तटकरे, राज्याचे धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जालन्याचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त सुनील माने, धर्मादाय वकील संघाचे अध्यक्ष एड. प्रदीप वामनराव कुलकर्णी, अजित सिंह पाटील यांनी केले आहे.

39 वर्षापूर्वीचे कार्यालय 16 आगस्ट 19 एप्रिल 83 ला या कार्यालयाची सुरुवात झाली आणि पहिले सहाय्यक धर्मदाय आयुक्त म्हणून बा.ब. यांनी पदभार स्वीकारला त्यानंतर सध्या पंधरावे  सहाय्यक धर्मदाय आयुक्त म्हणून सुनील माने हे कार्यरत आहेत शासनाने सहा कोटी 41 लाख 47 हजार रुपये या इमारतीसाठी मंजूर केले आहेत त्यापैकी चार कोटी 81 लाख रुपये खर्च झाले आहेत अजूनही काही विकास कामे चालू आहे दरम्यान या सूची इमारतीमध्ये न्यायदानासाठी दोन स्वतंत्र कक्ष सभाग्रह स्वतंत्र जनरेटर आणि उद्धव वाहनाची व्यवस्था केलेली आहे जालना जिल्ह्यासाठी ही एक सुंदर आणि देखणी इमारत सर्वे नंबर 488 च्या परिसरात उभे आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.