Jalna Districtखेळ

मुलाला ऑलम्पिक मध्ये पाठवायची इच्छा आहे का? असेल तर आजच या चाचणी साठी

जालना – ज्या पाल्यांना आपला मुलगा ऑलम्पिक मध्ये खेळावा अशी इच्छा आहे अशा पाल्यांसाठी ही खुशखबर आहे. आपल्या मुलाला आजच जिल्हा क्रीडा संकुलात होत असलेल्या क्रीडा नैपुण्य चाचणी मध्ये सहभागी करा.

आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण संतुलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यांच्यासाठी सुसंघटित प्रयत्न व्हावेत या हेतूने आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट बॉईज स्पोर्ट कंपनी पुणे हे क्रीडा नैपुण्य चाचणी घेत आहेत. लहान वयातच क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने, बॉईज स्पोर्ट्स कंपनी पुणे येथील प्रवेशाकरिता ही क्रीडा नैपुण्य चाचणी घेण्यात येत आहे. जिल्हास्तरावर दोन तारखेपासून ते 10 ऑक्टोबर पर्यंत जिल्हा क्रीडा संकुलात ही चाचणी सुरू आहे. आठ ते चौदा वयोगटातील फक्त मुलांसाठी ही चाचणी आहे. आठ ते बारा वयोगटातील मुलांसाठी डायव्हिंग तर दहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी, आणि वेटलिफ्टिंग या खेळांचा समावेश आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी या खेळांचे मूल्यमापन करून ते वरिष्ठ कार्यालयाला पाठवतील आणि पुन्हा एकदा निवड झालेल्या झालेल्या विद्यार्थ्यांना आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट कडे सोपवण्यात येईल.


आज जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या या निवड चाचणीसाठी क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, मार्गदर्शक संतोष वाबळे, फुटबॉल प्रशिक्षक शेख मोहम्मद, डॉ. श्याम
काबलिये, प्रमोद खरात, विजय गडकर, सचिन
दोरोके, संतोष मोरे, श्रीमती किरण पाटील आदींनी परिश्रम घेतले.
* हा होईल फायदा*

जिल्हास्तरावरून प्रथम निवड झाल्यानंतर राज्य स्तरावर पुन्हा एकदा चाचणी घेतल्या जाईल. आणि या चाचणीत पास झाल्यानंतर आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट पुणे इथे विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित होईल. हा प्रवेश निश्चित झाल्यानंतर पुढील शिक्षणाची ,राहण्याची आणि त्या विद्यार्थ्याला घडवण्याची जबाबदारी ही त्या इन्स्टिट्यूटची असेल. या इन्स्टिट्यूटमधून ऑलम्पिक साठी खेळाडू तयार करण्याचे ध्येय खेळाडू समोर ठेवला जाईल. आणि तसे प्रशिक्षण त्यांना दिले जाईल.

दिलीप पोहनेरकर,edtv news,९४२२२१९१७२

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.