Jalna Districtजालना जिल्हा

पोलिसांच्या सतर्कतेमुळे टाळला महामंडळाच्या कार्यालयातील राडा; कर्मचाऱ्यांनी कुलूप लावून ठोकली धूम

जालना- एका महामंडळाच्या कर्ज वाटपासाठी देण्यात येणारे कर्ज वाटपाचे विहित नमुन्यातील अर्ज लाभार्थ्यांना न मिळाल्यामुळे राडा होण्याची शक्यता होती. परंतु पोलिसांनी वेळीच लक्ष दिल्यामुळे हा प्रकार टळला आहे, मात्र पुन्हा 24 तारखेला राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयाला कुलूप लावून धूम ठोकली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आहे. आणि याच इमारतीमध्ये वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित मुंबई या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचे जिल्हा कार्यालय देखील आहे. या कार्यालयामार्फत प्रत्येकी एक लाख रुपये अशा दीडशे लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप होणार आहे. विहित नमुन्यातील अर्ज भरून दिल्यानंतर त्याची छाननी होऊन हे कर्ज मिळणार आहे. त्या कर्जाच्या अर्जासाठी या कार्यालयाकडे सध्या फक्त 75 अर्ज उपलब्ध आहेत आणि हे अर्ज कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आज वाटप करायला सुरुवात केली. परंतु अर्जाची संख्या आणि कर्ज मागणाऱ्यांची संख्या लक्षात घेता याचा ताळमेळ बसेना. त्यामुळे अर्ज मागणीसाठी आलेल्या अर्जदारांनी इथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला .
येथील जिल्हा व्यवस्थापक संदीप कृष्णा पवार यांच्याकडे अतिरिक्त प्रादेशिक व्यवस्थापकाचा पदभार असल्यामुळे ते देखील या कार्यालयात नव्हते. पर्यायाने सर्व जबाबदारी एक कम्प्युटर ऑपरेटर, एक लिपिक, आणि एक शिपाई यांच्यावर होती. कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक देविदास सोनावळे यांनी ताबडतोब या कार्यालयात धाव घेतली, लाभार्थी आणि कर्मचारी यांच्यासोबत समन्वय साधून तूर्तास होणारा राडा थांबविला आहे.

दरम्यान उर्वरित अर्ज हे दिनांक 24 रोजी वाटप केल्या जातील अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांचा रोष पाहून या कर्मचाऱ्यांनी स्वतःहूनच कार्यालयाला कुलूप ठोकून बाहेर जाणे पसंत केले. या कार्यालयात सध्या सुनील लष्कर हे कम्प्युटर ऑपरेटर, नरवडे लिपिक, आणि श्रीकृष्ण मुने हे शिपाई म्हणून कार्यरत आहेत.

https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com
एम.डी. पोहनेरकर,8275950190
http://www.edtvjalna.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.