Jalna Districtजालना जिल्हाराज्य

हापापलेल्या पुढाऱ्यांच्या आर्थिक अपेक्षा पूर्ण होत नाहीत-माजी आमदार जाधव

जालना- पुढारी हपापलेले आहेत आणि त्यांच्या आर्थिक अपेक्षा पूर्ण होत नाहीत, म्हणूनच सध्या हा राजकीय गोंधळ चालू आहे. याचा फटका सामान्य जनतेला बसणार आहे. त्यामुळे अशा राजकारण्यांना बाजूला सारून आर्थिक नीतीवर केंद्रित राजनितिक करणाऱ्या पक्षाला यावेळी मदत करा असे आवाहन माजी आमदार हर्षवर्धन रायभान जाधव यांनी केले आहे.

ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना श्री. जाधव म्हणाले की राज्य निवडणुक आयोगाने रायभान जाधव विकास आघाडीला मान्यता दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही आघाडी सर्व नगरपालिकांच्या सर्व जागा लढणार आहे . आणि आपल्या उमेदवारांना निवडणुकीसाठी आवश्यक असणारा बी फार्म देखील देणार आहे , त्या पार्श्वभूमीवर जालन्याचा हा दौरा असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे, देशाने जर स्वतःच्या मालमत्तेवरील कर वसुली केली तरीदेखील देशाचे कर्ज फिटेल आणि पैसा वाचेल एवढी संपत्ती आहे. मात्र तो कर वसूल केल्या जात नाही, त्यामुळे राजकारण्यांनी अर्थनीती वर केंद्रित राजकारण करायला हवे. ही अर्थनीती काय आहे? याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण “रायभान जाधव विकास आघाडी”च्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे ते म्हणाले.

निवडणूक लढण्यासाठी पैसा लागत नाही मात्र उमेदवार जाणून-बुजून पैसा खर्च करतात आणि निवडून आल्यानंतर तो वसूलही करतात, जो पैसा ते वसूल करतात तो पैसा आपणच दिलेल्या कराच्या माध्यमातून असतो. त्यामुळे असा पैसा खर्च करणाऱ्या उमेदवारांना निवडून नका, असे आवाहनही माजी आमदार रायभान जाधव यांनी केले आहे.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button