Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » बँकेच्या शिपायाने दिली टीप आणि लुटली पंधरा लाखांची रक्कम; सात जण गजाआड
    Jalna District

    बँकेच्या शिपायाने दिली टीप आणि लुटली पंधरा लाखांची रक्कम; सात जण गजाआड

    EdTvBy EdTvDecember 4, 2021No Comments3 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- रहदारीच्या रस्त्यावर बँक व्यवस्थापकाला मारहाण करून पंधरा लाख रुपये लुटून नेल्याची घटना 26 नोव्हेंबरला घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी तपास पूर्ण करून सात आरोपींना गजाआड केले आहे. आठवा आरोपी फरार असून त्याच्याकडे मोठी रक्कम शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे .दरम्यान बँकेच्या शिपायाने त्याच्या मित्राला टीप देऊन हा सर्व प्रकार घडवून आणला आहे.

    जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जालना अंबड रस्त्यावर गोलापांगरी येथे एक शाखा आहे. या शाखेचे व्यवस्थापक सुभाष गोडबोले हे नेहमीप्रमाणे जालना येथील मुख्य शाखेतून शेतकऱ्यांच्या अनुदानाची पंधरा लाख रुपये रक्कम दिनांक 26 रोजी गोलापांगरी येथे घेऊन जात होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गोलापांगरी जवळील इंग्रजी शाळेसमोर दुचाकीवरून आलेल्या काही लोकांनी मारहाण केली आणि त्यांच्या जवळील रोख रक्कम पळवली. महामार्गावर आणि सकाळी वाहतुकीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि कामालाही लागली. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला . हा तपास करत असताना जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जालना शहरातीलच सतकर कॉम्प्लेक्स शाखेत सफाई कामगार म्हणून काम करत असलेल्या सुदर्शन कमाने याचा यामध्ये हात असल्याचा सुगावा त्यांना लागला. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने त्याचा सारवाडी येथे राहणारा मित्र शत्रुघ्न उर्फ बबन गायकवाड याला ही माहिती दिली होती, आणि मुख्य शाखेतून सुभाष गोडबोले हे शाखाधिकारी नेहमी अशा प्रकारची रोकड घेऊन जातात असेही सांगितले होते. त्यानुसार बबन गायकवाड याने ्याच्या काही सहकार्‍यांच्या मदतीने यापूर्वी दोन वेळा अशा प्रकारची रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो यशस्वी झाला नाही.हे उघड झाले आहे. 26 11 ला केलेला प्रयत्न यशस्वी झाला मात्र पोलिसांच्या तपासात पुन्हा या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. सुदर्शन कमाने आणि बबन गायकवाड यांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी चौकशी केल्यानंतर बबन गायकवाड याने या सर्व प्रकरणाची कबुली दिली, तसेच सराईत गुन्हेगार गजानन सोपान शिंगाडे, वय 32 राहणार पाचन वडगाव तालुका जालना, करणसिंग छगनसिंग भोंड, 28. अर्जुनसिंग छगनसिंग भोंड, 23. कंवरसिंग छगनसिंग भोंड, 20. आणि सुनील उर्फ वैजनाथ भुतेकर 22, सर्वजण राहणार लोधी मोहल्ला जालना यांनी केले असल्याचे सांगितले. पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून लुटलेल्या रक्कमपैकी एक लाख 20 हजार आणि गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या मोटरसायकल असा एकूण दोन लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार आहे आणि त्याच्याकडे सुमारे बारा हजारांची रोख रक्कम असल्याचे सांगण्यात येत आहे.
    पोलिस या आठव्या आरोपीचा शोध घेत आहेत. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, दुर्गेश राजपूत, कृष्णा तगे, गोकुळसिंग कायटे, सचिन चौधरी, कैलास चेके, सॅम्युअल कांबळे, महिला पोलीस कर्मचारी चंद्रकला शडमल्लू, गोदावरी सरोदे, रेणुका बंडे, यांनी पूर्ण केला.


    या तपासा बद्दल अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे

    *दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
    https://edtvjalna.com
    डाउनलोड edtvjalna app

    15lack edtv jalna sp jdcc lcb metaroll rajuri
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleआरोग्य विभागाच्या पेपर फुटीचे औरंगाबाद केंद्र..! – आणखी तिघांना पुणे पोलीसांकडून अटक,
    Next Article मुख्याध्यापकांसोबतच्या वादातून शिक्षिकेने घेतले विष
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    May 28, 2025

    जिल्हाधिकारी कार्यालय व राजुरी स्टील जालना यांचा संयुक्त उपक्रम; “मी बारावी पास मतदार नोंदणी करणार हमखास ” उपक्रम राबविणार

    May 28, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,130 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025949 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025719 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025512 Views
    Don't Miss
    Breaking News May 31, 2025

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    जालना- जालना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत . या…

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    जिल्हाधिकारी कार्यालय व राजुरी स्टील जालना यांचा संयुक्त उपक्रम; “मी बारावी पास मतदार नोंदणी करणार हमखास ” उपक्रम राबविणार

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.