जालना- शेतीच्या वादातून अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथे असलेल्या माने कुटुंबात वाद सुरू आहे. या वादाचे पर्यावरण सासूने सुनेच्या शेतातील कपाशीचे पीक उपटून टाकले आणि संताप व्यक्त केला.
https://youtu.be/Bt2slfVSpkc
हे पीक उपटीत असताना सून देखील शेतातच मुलासह उपस्थित होती. दरम्यान या दोघींमध्ये सुरुवातीला शिवीगाळ झाल्यानंतर संतापलेल्या सासूने सुनेवर चांगलाच हल्ला चढविला आणि शेतातच या दोघींमध्ये चांगली झटापट झाली. याप्रकरणी सुनेने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे आणि या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी अदखलपात्र गुन्हाही नोंद केला आहे. दरम्यान शेतामध्ये झालेल्या सासु सुनेच्या या झटापटीचा व्हिडिओ सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com