Jalna DistrictRanraginiSerials

तणाव मुक्ती ची साधनं घरातच, बाहेर जायची गरजच काय?

जालना- दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत आहे या नावाखाली बाहेर फिरण्याची पद्धत वाढत चालली आहे. विशेष करून शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये हे फॅड जास्त आहे. खरेतर ताण -तणाव घालवण्याची साधने ही घरातच आहेत. घरातील माणसांसोबत राहिलं की तो आपोआप कमी होतो ,मात्र आता तसे होत नाही. त्यासोबत तरुण पिढीला देखील देश प्रेम आणि आत्मीयता राहिलेली नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काय खस्ता खाल्ल्या हे त्यांना माहीत नाही, ही एक खंत आहे! आणि ही खंत व्यक्त केली आहे एकेकाळच्या बॅडमिंटन पटू, गायिका, लेखिका, आणि भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या जिल्हाध्यक्षा सौ .शुभांगी श्रीकांत देशपांडे यांनी.

ई.डी टीव्ही न्यूज. वर सुरू असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्य सुुरू असलेल्या” रणरागिनी” मालिकेत त्यांनी आज चौथे पुष गुंफले, आणि या विशेष मालिकेत त्यांनी पारिवारिक, सामाजिक, राजकीय, आणि स्वतः विषयीची सर्व मते दिलखुलासपणे मांडली.

-दिलीप पोहनेरकर, edtv news,९४२२२१९१७२

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.