Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    तहसीलदारांनी वीज कंपनीला केले रस्त्याचे अर्पण!; शेतकरी परिवार करणार तहसीलदारांना देहांच समर्पण!

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » पहिले शरण संत साहित्य संमेलन रविवारी जालन्यात
    Jalna District

    पहिले शरण संत साहित्य संमेलन रविवारी जालन्यात

    EdTvBy EdTv23/02/2023No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना-महाराष्ट्र शरण साहित्य परिषद आयोजित पहिले शरण संत साहित्य संमेलन जालन्यात दिनांक 26 फेब्रुवारी रोजी होत आहे. मंठा चौफुली परिसरात असलेल्या कलश सीड्स च्या सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता कर्नाटक मधील भालकी येथील हिरेमठ संस्थांचे बसवलिंग पट्टेदेवरू यांच्या अध्यक्षतेखाली, आजरा जिल्हा कोल्हापूर येथील राजाभाऊ शिरगोपे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भालकीचे राजू जुबरे यांच्यासह स्वागताध्यक्ष एड. मधुकर आप्पा लिंगायत यांच्यासह कार्याध्यक्ष प्राध्यापक बसवराज कोरे, निमंत्रक शरद आप्पा सवादे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

    अशी माहिती या संमेलनाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.सविस्तर माहिती देताना बसवराज कोरे यांनी सांगितले की, लिंगायत ही एक चळवळ आहे आणि ही चळवळ बसवेश्वरांनी सुरू केले आहे. त्यामुळे या चळवळीमध्ये सर्वच जाती धर्मांना सोबत घेऊन काम करणारी ही चळवळ आहे. तसेच जो स्वतःच्या कामावर मेहनतीवर जगतो त्याला लिंगायत संबोधले जाते, आणि म्हणूनच भारतात कुठेही लिंगायत भीक मागताना दिसत नाहीत .त्यासोबत महात्मा बसवेश्वरांनी जातिवाद मोडून काढला आहे आणि त्यांनी केलेल्या या कामाला पुन्हा उजाळा देण्यासाठी या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

    साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या अनुभव सभेत “शरण लिंगायत चळवळीचे साहित्य आणि मराठी संत” या विषयावर सोलापूर येथील पत्रकार चेन्नवीर भद्रेश्वरमठ ,सांगोला येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर ,लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी येथील प्रसिद्ध- लेखक कवी विचारवंत फ.म .शहाजिंदे हे वक्ते विचार मांडणार आहेत. यावेळी महानुभाव विचारवंत बाबुळगावकर शास्त्री हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तिसऱ्या सत्रात “12 व्या शतकातील क्रांतिकारक महात्मा बसवेश्वर आणि लिंगायत धर्म” या विषयावर लातूर येथील डॉ. राजशेखर सोलापुरे आणि जालना जिल्ह्यातील डॉ. मारुती तेगंपुरे हे विचार मांडणार आहेत .यावेळी बसवलिंग पट्टेदेवगुरू हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. रात्री आठ वाजता कवी संमेलन होणार आहे. दिवसभर अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल 26 तारखेला होणार आहे . विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन राजेंद्र वांजोळे, यशवंत सोनुने, विनोद वीर, सुहास सदावर्ते, हे करणार आहेत. तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी पुरुषोत्तम सोसे, रमाकांत बरीदे, एस. आर. बोंद्रे, पंढरीनाथ सारके, यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला प्राध्यापक पंढरीनाथ सारके, राजेंद्र वांजुळे, पुरुषोत्तम सोसे, शिवकुमार थळकरी, डॉ. यशवंत सोनूने, सुहास सदाव्रते, यांची उपस्थिती होती.

    दिलीप पोहनेरकर
    9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    26 फेब्रुवारी पहिले शरण संत साहित्य संमेलन महात्मा बसवेश्वर लिंगायत समाज
    Share. Facebook WhatsApp
    Previous ArticleGDCC प्रकरण- न्यायमूर्तींनी दीड तास युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय ठेवला राखून
    Next Article न्याय मंदिरात पोवाड्यांचे सूर; न्यायमूर्तींची दाद
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    तहसीलदारांनी वीज कंपनीला केले रस्त्याचे अर्पण!; शेतकरी परिवार करणार तहसीलदारांना देहांच समर्पण!

    28/06/2026

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    24/06/2026

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,106 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,130 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,167 Views

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    24/06/20261,758 Views
    Don't Miss
    Breaking News 28/06/2026

    तहसीलदारांनी वीज कंपनीला केले रस्त्याचे अर्पण!; शेतकरी परिवार करणार तहसीलदारांना देहांच समर्पण!

    जालना-सरकारी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे गेल्या 13 वर्षांपासून बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथील शेतकरी तहसील कार्यालयात चक्कर मारून…

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    जि.प.च्या गटशिक्षणाधिकाऱ्याला वाढीव वर्गाची “एलर्जी”?

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    तहसीलदारांनी वीज कंपनीला केले रस्त्याचे अर्पण!; शेतकरी परिवार करणार तहसीलदारांना देहांच समर्पण!

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    सहकाऱ्यांची पिळवणूक पहावेना; डॉक्टरांनीच केले ठिय्या आंदोलन

    07/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.