जालना- संकट मोचन ,बजरंगबली, मारुती, हनुमान, असे विविध नावे असलेल्या हनुमानाचा जन्मोत्सव रात्री उत्साहात पार पडला.जालना शहराचे आराध्य दैवत असलेले रामनगर परिसरातील श्री दक्षिण मुखी धनतरुप हनुमान मंदिरात बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला.
पंचक्रोशीमध्ये या मारुतीची नवसाला पावणारा मारुती म्हणून ख्याती आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण होते. पहाटे पाच वाजल्यापासूनच फुलांचा सुगंध, श्री फळांचे ढीग, मंदिरामध्ये भाविकांची लगबग, दर्शनासाठी लागलेल्या रांगा, श्रीफळ फोडण्याचे आवाज, आणि सायंकाळी यामध्ये भर घातली ती बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाने. भाविक मारुतीला नवस बोलतात आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतर तो फेडण्यासाठी या बारा गाड्या ओढतात. गेल्या 111 वर्षांची ही परंपरा आजही सुरू आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com