जालना- वाईनशॉप चे हस्तांतर करून देण्याच्या बहाण्याने इतर फर्मच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास चार टक्के परतवा देण्याचे आमिष दाखवून या प्रकरणातील तक्रारदार अविनाश धर्मा चव्हाण वय 51 वर्ष राहणार समर्थ नगर जालना यांची 6 कोटी 77 लाख रुपये फसवणूक केली. हा फसवंतीचा प्रकार दिनांक एक जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2022 दरम्यान घडत होता. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम 420 आणि अन्य कलमान्वये दिनांक 27 जून 2023 रोजी गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणाचा तपास आर्थिक गुणशाखेकडे आल्यानंतर मुख्य सूत्रधार अमित जगदीश खट्टर याला दिनांक 6 फेब्रुवारी पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी सात दिवस आणि पुन्हा एकदा चार दिवस अशी दोन वेळा त्याची पोलीस कोठडी वाढवून मिळाली होती. काल छत्रपती संभाजी नगर येथून अमितचे अन्य दोन साथीदार ताब्यात घेण्यात आले आहेत. या दोन्ही साथीदारांनी पुणे येथे मूळ मालकाच्या आधार कार्डावर आपले स्वतःचे छायाचित्र लावून वाईन शॉप चे हस्तांतरण केल्याचे भासवले होते.
गुन्हयातिल मुख्य सुत्रधार आरोपी नामे अमित जगदिश खटटर, वय ३८ वर्षे रा. तलरेजा नगर जालना यास दिनांक 6 फेब्रुवारी ला अटक केली होती.तसेच दुकान मालक असल्याचे भासवून उभे केलेले साथीदार आरोपी नामे रमिज वेग ईसा वेग वय ३३ वर्षे रा. आजाद कॉलेज जवळ रोजा बाग, सिडको छत्रपती संभाजीनगर, सय्यद अफसरअली सय्यद महेमुद वय ५० वर्षे रा. रहेमानीया कॉलनी किराडपुरा, छत्रपती संभाजीनगर ह.मु. यासीननगर हसुल ता.जि. औरंगाबाद यांना दिनांक १५. रोजी अटक करण्यात आले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस अधिकारी श्री. सय्यद गणेश सुरवसे, सहा. पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, फलसिंग घुसिंगे, गजानन भोसले, अंबादास साबळे, ज्ञानेश्वर म्हस्के, श्रीकुमार आडेप, चंद्रशेखर मांटे, महीला अमलदार निमा घनघाव एम.डी. लोणकर निकम यांनी केली आहे.
पार्श्वभूमी समजण्यासाठी वाचा दि.4 नोव्हेंबरची ही बातमी.आपल्याकडे देशी विदेशी दारूचे परवाने हस्तांतरित करण्यासाठी उपलब्ध आहेत आणि ते स्वस्तात मिळवून देतो ,त्या बदल्यात फक्त एक टक्का कमिशन द्या! असे म्हणत एका शेतकऱ्याची सहा कोटी 21 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याने दिलेली रक्कम परत मागण्यासाठी तगादा लावला, परंतु त्याच्यावरच खोटा गुन्हा दाखल करून सहा कोटी 21 लाख रुपये फसवणूक करणाऱ्या जालना येथील दारू व्यापाऱ्याच्या परिवाराच्या विरोधात नंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळलनंतर हा परिवार मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात गेला, मात्र तेथे देखील काल दिनांक तीन रोजी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार अविनाश धर्मा चव्हाण वय 51 वर्ष राहणार समर्थ नगर जालना, यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिनांक 27 जून 2023 रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीमध्ये वाईन शॉप हस्तांतर करून देण्याचा बहाणा करून तसेच फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतवा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी जगदीश दीपचंद खट्टर ,राहणार, तलरेजा नगर अमित जगदीश कट्टर ,परिवारातील इतर दोन महिला आणि पुणे येथील आणखी तीन आरोपी अशा एकूण सात आरोपीविरुद्ध अविनाश धर्मा चव्हाण आणि त्यांचे सहकारी पुनम सिंग महादू सिंग डोभाळ यांच्याकडून वेळोवेळी सुमारे साडेसहा कोटी रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 420, 546, 465, यासह अन्न कलमान्वये गुन्हा नोंद केला होता. दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळून लावल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठामध्ये केलेला अर्ज देखील न्यायालयाने शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी फेटाळून लावला आहे.
सदर बाजार मध्ये दाखल झालेला हा गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना आरोपींनी पुणे आणि नागपूर येथे देशी-विदेशी दारूचे परवाने हस्तांतरणासाठी उपलब्ध आहेत आणि ते तक्रारदाराला उपलब्ध करून देऊ असे म्हणत वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या वेळी रोख रक्कम जमा केली, तसेच पुणे येथे नोटरी झाल्यानंतर तीन बनावट ग्राहक देखील उभे केले. परंतु प्रत्यक्षात ताबा घेताना हा सर्व प्रकार खोटा असल्याचे तक्रारदाराचे निदर्शनास आले. त्यामुळे तक्रारदाराने वारंवार खट्टर यांच्याकडे ज्या मध्यस्थ्याच्या मार्फत हा व्यवहार झाला होता त्याच्यामार्फत हे पैसे परत मागितले परंतु ते मिळत नसल्यामुळे तक्रारदार स्वतः कट्टर यांच्याकडे जाऊन पैशाचा तगादा लावू लागला. पैसे तर परत मिळाले नाहीत उलट तक्रारदारावरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला .आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर तक्रारदार अविनाश धर्मा चव्हाण हे स्वतः खट्टर यांच्याकडे गेले परंतु त्यांना अरेरावी आणि मारहाणाची भाषा करून परत पाठविले .विविध ठिकाणी गुन्हे दाखल सदर बाजार मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर हा सर्व प्रकार बनावट असल्याचे समोर आले आहे. आर्थिक गुन्हाशाखेच्या पोलिसांनी तपास केल्यानंतर अशाच प्रकारची फसवणूक झाल्याच्या तक्रारी वाढवणी पुणे शहर पोलीस ठाण्यात ,तक्रारदार दिलीप जमुनादास द्यानानी, राहणार घाटकोपर मुंबई यांनी 43 लाख 1 हजार रुपये ,औरंगाबाद शहर उस्मानपुरा पोलीस ठाण्यात रत्नप्रभा संजय घुगे ,राहणार समता नगर औरंगाबाद यांनी सत्तर लाख रुपये ,अविनाश धर्मा चव्हाण राहणार समता नगर जालना यांनी सहा कोटी तीस लाख रुपये आणि एक कोटी 25 लाख रुपये साक्षीदार पूनमसिंग महादू सिंग डोभाळ यांनी 56 लाख रुपये आणि विठ्ठलराव माधवराव भोसले राहणार नांदेड यांनी 51 लाख अशा एकूण नऊ कोटी 75 लाख 1000 रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
देशी विदेशी दारूचे परवाने हस्तांतरित करण्यासाठी दिनांक एक फेब्रुवारी 2022 ते 31 नोव्हेंबर 2022 दरम्यान या घडामोडी घडल्या.जालना येथील खट्टर यांच्या तलरेजा येथील घरी, बनावट परवाना हस्तांतरित करणाऱ्या तीन बनावट व्यक्तींसोबत पुणे येथे आणि छत्रपती संभाजीनगर येथे हे व्यवहार झाले. नागपूर येथील सुरुची वाईन्स आणि भोर पुणे येथील एस .ए. शेख अँड कंपनी वाईन शॉप या दुकानाचे परवाने हस्तांतरित करून देण्याच्या बदल्यात एक टक्का कमिशन घेण्याच्या लिखापढीवर आणि नोटरीवर हे एवढे व्यवहार झाले आहेत. अविनाश धर्मा चव्हाण यांनी त्यांचे जालना तालुक्यातील बाजी उमरद येथे राहणारे मित्र अजय दीपा राठोड यांच्या मध्यस्थीने हे व्यवहार केले होते.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172