जालना -कै.मधुकरराव (अण्णा )गोसावी स्मृती प्रित्यर्थ विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान, जालना जिल्ह्याच्या वतीने दोन गटांमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .निबंध स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून विजेत्यांना मात्र रोख बक्षीस देण्यात येणार आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान जालना जिल्ह्याच्या बालिका शिक्षण विभागाच्या जिल्हाप्रमुख डॉ. सौ.धनश्री सबनीस यांनी याविषयी माहिती दिली.
शिक्षकांसाठी असलेल्या स्पर्धेसाठी “मनाच्या श्लोकातील मनाचे सामर्थ्य” हा विषय देण्यात आला आहे तर विद्यार्थ्यांसाठी “श्री समर्थ रामदास स्वामी” हा विषय असणार आहे. स्पर्धक हा जालना जिल्ह्यातील असावा, निबंधाची शब्द संख्या कमाल 1000 पर्यंत आहे ,निबंध हा मराठी, हिंदी इंग्रजी भाषेत असावा. कांही श्लोकांचे विवेचन करणे देखील या निबंधात अपेक्षित आहे. स्पर्धकाने स्व हस्ताक्षरात निबंध लिहावा, निबंध पाठविण्याची शेवटची तारीख 1 एप्रिल 2024 आहे, पारितोषिक प्राप्त निबंधांना विद्याभारती कडून यथोचित प्रसिद्धी देण्यात येणार आहे. स्पर्धकाला प्रमाणपत्र ही मिळणार आहे, त्याच सोबत दोन्ही गटातील प्रथम पारितोषिक विजेत्याला रोख तीन हजार रुपये, द्वितीय पारितोषिक विजेत्याला रोख दोन हजार रुपये, तर तृतीय पारितोषिक विजेत्याला रोख एक हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपला निबंध सोबत दिलेल्या गुगल फॉर्म वर भरावा किंवा निरामय हॉस्पिटल जालना येथे पोहोच करावा. असे आवाहन विद्याभारती देवगिरी प्रांताचे जालना जिल्हाध्यक्ष डॉ. पद्माकर सबनीस जिल्हा मंत्री शार्दुल भाले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172