Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अधिकाऱ्यांच्या बदल्या! जल”बिन” मिशनच्या चौकशीचे काय?

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणी लातूर मधील पाच अधिकाऱ्यांना 12 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी
    राज्य

    आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणी लातूर मधील पाच अधिकाऱ्यांना 12 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

    EdTvBy EdTvDecember 7, 2021Updated:December 8, 2021No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    Ofपुणे-आरोग्य विभागाच्या पेपर फूटीप्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने पर्दाफाश करत लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाचजणांना अटक केली. यात डॉक्टर, शिक्षकाचा समावेश आहे. आतापर्यंत या प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आली आहे.


    याप्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय ५०, रा. योगेश्वरी नगरी, अंबेजोगाई, जि. बीड), डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (वय ३६, रा. एकात्मता कॉलनी, अंबेजोगाई, जि. बीड), उद्धव प्रल्हाद नागरगोजे (वय ३६, रा. तितरवणे, ता. शिरूर कासार, जि. बीड), शाम महादू म्हस्के (वय ३८ ,रा. पंचशीलनगर, अंबेजोगाई, जि. बीड), राजेंद्र पांडुरंग सानप (वय ५१, रा. शामनगर, जि. बीड) यांना अटक केली आहे. यापूर्वी विजय मुऱ्हाडे, अनिल गायकवाड, बबन मुंढे, सुरेश जगताप, संदीप भुतेकर, प्रकाश मिसाळ यांना अटक केली होती. आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी तक्रार दिली आहे.
    आरोग्य विभागाच्या गट ड परिक्षेचा पेपर फुटला होता. या गुन्ह्याचा तपास सायबर गुन्हेकडून सुरू होता. तांत्रिक तपासावरून प्रथम विजय मुर्हाडे याला अटक केली होती. त्यानंतर इतर आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतरच्या तपासात या पाच जणांचा समावेश आढळून आला आहे. त्यांना मंगळवारी (७ डिसेंबर) अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालायने त्यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
    पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डी. एस. हाके, उपनिरीक्षक अमोल वाघमारे यांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा तपास केला जात आहे.  
    उद्धव नागरगोजे हे जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक आहेत. तर, डॉ. संदीप हे आंबेजोगाई येथील मनोरुग्णालयात डॉक्टर आहेत. तसेच, शाम म्हस्के हे बीडच्या रुग्णालयात नोकरी करत. राजेंद्र सानप हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील सहाय्यक अधिक्षक ग्रामीण रुग्णालयात आहेत.

    *edtv news, pune*

    edtv helth exm jalna zp latur pune
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleतीन मजली घरात दोन तासात चोरी आणि दहा लाखांचा ऐवज लंपास
    Next Article आरोग्य आणि स्वच्छता विभागावरून जीपच्या सर्वसाधारण सभेत दांगडु
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 2025

    35 लाख पचवले, परंतु पाच लाख पचवताना झाले अपचन आणि अडकले लाचेच्या जाळ्यात; छ संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पकडले रंगेहात

    May 27, 2025

    पुढील दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्र होणार “भोंगा” मुक्त ;साडेतीन हजार प्रमाणपत्रांची घरोघर जाऊन तपासणी-किरीट सोमय्या

    May 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20251,213 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,140 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025719 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025512 Views
    Don't Miss
    Breaking News June 1, 2025

    अधिकाऱ्यांच्या बदल्या! जल”बिन” मिशनच्या चौकशीचे काय?

    जालना- सर्वच विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू आहे. कोणाची विनंतीवरून, कोणाची मुदत संपल्यामुळे, तर…

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अधिकाऱ्यांच्या बदल्या! जल”बिन” मिशनच्या चौकशीचे काय?

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    ईद निमित्त जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या गो सेवा आयोगाच्या सूचना; हिंदुत्ववादी संघटनांचेही पोलीस अधीक्षकांना निवेदन

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.