Jalna District

कपड्यावरील कर सात टक्क्यांनी वाढला; कपडे होणार महाग

कपड्यावर असलेला 5 टक्के जीएसटी कर 12 टक्के करण्यात आल्यामुळे कपड्याचे भाव वाढतील, ही करवाढ कर चोरी साठी कपडा व्यापाऱ्यांना भाग पाडेल अशी भीती पडा व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे. जालना कपडा मर्चंट असोसिएशनने आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे.

कपडा व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ज्यावेळी हा कर लागू झाला त्यावेळी पाच टक्केपेक्षा जास्त कर वाढ होणार नसल्याचे म्हटले होते. जिथे बारा टक्के असेल तो घटवून पाच टक्के करू असे सांगण्यात आले होते, मात्र आता परिस्थिती उलटी होत आहे. पाच टक्के असलेला हा कर नुकत्याच निघालेला अधिसूचनेनुसार बारा टक्के होत आहे. या वाढीव करामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामध्ये महत्त्वाची समस्या म्हणजे कपड्याचे भाव वाढतील, लहान व्यापारी अडचणीत येतील, आणि हे सर्व परवडणार नाही म्हणून कदाचित कर चोरी देखील वाढू शकते, असेही या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे कपडा व्यवसाय वाढवण्यासाठी वाढवलेला कर मारक ठरणार आहे. त्यामुळे आहे तो पूर्वीप्रमाणेच कायम ठेवावा आणि वाढवलेला कर मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. आजच्या या शिष्टमंडळाला मध्ये कपडा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शाम भरतिया, सचिव अर्जुन बजाज, उपाध्यक्ष महेश नाथानी, कोषाध्यक्ष सुदर्शन बांगड, कांतीलाल राठी, नरेंद्र अग्रवाल, महेश गेही , राजेश पंजाबी, श्याम लोया, आदी व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.

दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
http://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button