खुनी आईबाप तपासण्यात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांची महत्त्वाची भूमिका

जालना- संसारामध्ये पोटाला चौथी ही मुलगी आल्याचा राग मनात धरून अवघ्या एक महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून देऊन त्या मुलीचा खून करण्यात आला होता. ना कुठे तक्रार ना कुठे वाच्यता, परंतु पोलिसांना या मुलीचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला आणि पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणण्याचे ठरवले. तक्रार देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनेच देण्यात आली. अशा या किचकट तपासासाठी पोलीस प्रशासनाने जालना जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका ,मदतनीस आणि आशा वर्कर्स यांची मदत घेतली. मागील सहा महिन्यांमध्ये जालना जिल्ह्यात किती मुली जन्माला आल्या ,याची सर्व माहिती गोळा करण्यात आली. त्यापैकी 500 मुलींच्या घरी पोलिसांनी विचारणा केली आणि त्यामधून सापडले ते खुनी मुलीचे आईबाप .या सर्व किचकट प्रकरणाची माहिती दिली आहे जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtv jalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172