जालना- कोविड 2019 मध्ये बहुतांश जनता ही घरीच होती .विशेष करून महिला आणि तरुणींनी युट्युब वर वेगवेगळे खाद्यपदार्थ पाहून ते घरीही करायलाही सुरुवात केली .त्यावेळेस पेव फुटले ते केक बनवण्याचे ,आणि केक म्हणजे वाढदिवसाचा पदार्थ. नुसते घरीच बनवले नाही तर याचे क्लासेस देखील घेतल्या गेले आणि त्यानंतर सुरू झाला सपाटा तो मिळेल तिथे वाढदिवस साजरा करण्याचा. त्यातूनच रस्त्यावर तलवारीने केक कापणे, मध्यरात्री dj लावून केक कापणे असे आणि या प्रकारांना खतपाणी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील घातले .त्यांनी देखील आपापल्या कार्यालयामध्ये सहकाऱ्यांचे वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली. परंतु आता असे वाढदिवस साजरे करायला शासनाने बंदी घातली आहे आणि त्या संदर्भात दिनांक 20 जुलै 2025 रोजी परिपत्रकही काढले आहे.
जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांनी दिनांक 20 जून 2025 रोजी काढलेल्या या परिपत्रकात म्हटले आहे की अनेक शासकीय कार्यालयांमध्ये सरकारी कर्मचारी हे आपल्या सहकारांचे वाढदिवस साजरे करताना निदर्शनास आले आहे असे वाढदिवस साजरे करताना कार्यालयीन कामाचा वेळ वाया जातो तसेच अभ्यासांना अधिकाऱ्यांच्या भेटीची वाट पाहावी लागते आणि कामांमध्ये दिरंगाई होते त्यामुळे असे वाढदिवस यापुढे कोणत्याही कार्यालयात साजरे करण्यात येऊ नयेत आणि ते होऊ नयेत याची काळजी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि तशी बाब निदर्शनास आली तर वरिष्ठांना जबाबदार धरण्यात येईल.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
*दिलीप पोहनेरकर * ९४२२२१९१७२