Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    “शांतीकुंज” मध्येच “अशांती”; महिलांच्या “सुधारगृहातच” आर्थिक”बिघाड”?

    विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर गुत्तेदाराचा डल्ला!

    “मॅनेज करा”जि.प च्या प्रस्थापित अधिकाऱ्यांचा चौकशी समितीला दम;तर सीईओंना अजब सल्ला!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » “शांतीकुंज” मध्येच “अशांती”; महिलांच्या “सुधारगृहातच” आर्थिक”बिघाड”?
    Breaking News

    “शांतीकुंज” मध्येच “अशांती”; महिलांच्या “सुधारगृहातच” आर्थिक”बिघाड”?

    EdTvBy EdTv06/08/2026Updated:06/08/2026No Comments4 Mins Read1 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राज्यातील पीडित महिलांना, सुधारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला महिला राज्यगृह आहेत. जालन्यात देखील “शांतीकुंज” महिला राज्यगृह हे सतकर नगर येथे आहे. या ठिकाणी अठरा वर्षांपुढील पीडित महिलांना ठेवल्या जाते. त्यामुळे इथे या महिलांच्या निवासस्थानापासून सर्व काही मोफत असते. साहजिकच सर्वच व्यवस्था मोफत असल्यामुळे आर्थिक व्यवहार देखील मुक्तपणे होतात.

    मूळ मुद्दा असा आहे की पीडित महिलांना, मुलींना बालहक्क समितीकडून इथे पाठविल्यानंतर जेव्हा या पीडितांना आपल्या पालकांच्या स्वाधीन केल्या जाते. ते करण्यासाठी देखील पैसे घेत असल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांवर आहे. असाच आरोप बालकल्याण समितीच्या सदस्यांवर देखील आहे आणि त्यातूनच मध्यंतरी, या सदस्यांमध्ये गुन्हे दाखल होण्यापर्यंत प्रकरण गेले होते. खरंतर या समितीला न्यायाधीश पदाचा दर्जा आहे, असे असताना असे प्रकार झाल्यामुळे महाराष्ट्रात जालनाच्या समितीचे नाक कापले होते.


     तूर्तास या शांतीकुंज महिला राज्यगृहातील कनिष्ठ लिपिक सविता चापले यांचे प्रकरण गाजायला लागले आहे. श्रीमती चापले यांनी दिनांक 14 मे 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत या राज्यगृहात कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी धमक्या दिल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी तात्काळ दखल घेत त्याच दिवशी उपजिल्हाधिकारी श्रीमती मनीषा दांडगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.व्ही. कड,उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद जालना श्रीमती कोमल कोरे यांची समिती नियुक्त करून स्वयं स्पष्ट अहवाल देण्याचे सूचित केले होते. त्या अनुषंगाने या प्रकरणाची चौकशी होऊन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर झाला आणि खरा प्रकार इथूनच उघडकीस यायला लागला. या प्रकरणाचा निकाल श्रीमती चापले यांच्या बाजूने लागला आणि तीन महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले.


    दरम्यान याच काळात महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांनी देखील इथे होत असलेल्या पीडितांच्या पिळवणुकीला वाचा फोडली आणि खरा त्रास आमच्यापासून नाही तर या कर्मचाऱ्यांपासूनच असल्याचे त्यांनी उघडकीस आणले.
     त्यासंदर्भात कंत्राटी कर्मचारी सौ.रमा अजय सुरडकर ,सौ.पूजा कुडके सौ.सुरेखा मस्के यांनी श्रीमती चापले या पीडित महिलांना त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यासाठी पैसे घेत असल्याचे पुरावेत सादर केले. या पुराव्यानुसार श्रीमती चापळे यांनी त्यांचे पती आणि मुलगा या दोघांच्या खात्यावर मोबाईलच्या माध्यमातून पैसे घेतल्याचा पुरावा म्हणून खात्यावर जमा झालेल्या पैशांचा स्क्रीन शॉट तक्रारी सोबत जोडला. आणि ही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांसह महिला व बाल विकास विभागाच्या सर्व वरिष्ठांकडे करण्यात आली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पुन्हा श्रीमती चापले यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. कड यांनी दिले. याच कार्यालयातील विधी सल्लागार यू.टी.कुटे आणि श्रीमती वाय.यू. चव्हाण यांची नियुक्ती केली.

    या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला. या चौकशी अहवालामध्ये एकूण चार प्रकरणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एका पिडीतेच्या नातेवाईकाच्या खात्यावरून श्रीमती चापले यांचे पती दीपक ढाके यांच्या खात्यावर पाच हजार रुपये. आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा ढाके यांच्या खात्यावर पाच हजार रुपये पाठवल्याचे निष्पन्न झाल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच अन्य दोन प्रकरणे देखील सादर केली होती परंतु त्यामध्ये ठोस पुरावे आढळत नसल्याचे म्हटले आहे. तसेच श्रीमती चापले यांनी या कार्यालयात सादर केलेला खुलासा समाधानकारक वाटत नाही असेही म्हटले आहे.


    दरम्यान ही चौकशी इथेच थांबली नाही तर आणखी एका वेगळ्या अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी करण्याचे आदेश दिनांक 17 जुलै 2026 रोजी विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास ,कृष्णा राठोड यांनी दिले आहेत. या आदेशानुसार रमा सुरडकर ,पूजा कुडके सुरेखा मस्के ,यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाल विकास प्रकल्प अधिकारी नवनाथ वामन आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या परिवीक्षा अधिकारी श्रीमती योगिता चव्हाण या दोघांची समिती पुन्हा आता ही चौकशी करणार आहे.
    मोबाईलवर पैसे घेतल्याचा आरोपाबद्दल चौकशी समितीने श्रीमती चापले यांना विचारले असता श्रीमती चापले यांच्या खुल्याशानुसार त्यांचे पती शिवणकामाचा व्यवसाय करतात त्यांना विश्वासात घेऊन वरील तिन्ही महिलांनी पीडितेच्या नातेवाईकांना हाताशी धरून हे पैसे पाठवले असावेत अशी शक्यता वर्तवली आहे.
     एकंदरीत सध्या जिल्हा व महिला व बालविकास विभागाच्या जालना येथील शांतीकुंज मध्ये सर्वत्र अशांतीच पसरलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये इथे अठरा वर्षांपुढील युवती व महिलांसोबत अल्पवयीन महिलांना देखील ठेवल्या जाते. त्यामुळे या अल्पवयीन मुलींना या महिलांच्या अत्याचाराला बळी पडावे लागत आहे. एवढेच नव्हे तर या मुलीकडून नको नको ती कामे करून घेऊन त्यांना वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न देखील याच “सुधार” रामराम सर.आपल्या शुभेच्छा पाठीशी आहेतच,म्हणूनच आज मी भक्कमपणे उभा आहे,ही शिदोरी कायम माझ्यापाठीशी ठेवावी ही विनंती.धन्यवाद!- दिलीप पोहनेरकर. होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे महिलांसाठी असलेले हे शांतीकुंज राज्यगृह “सुधारगृह” आहे का “बिघाडगृह” या विषयावर चर्चा रंगला लागले आहेत.

    सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
    ■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
    ■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    ■दिलीप पोहनेरकर,
    9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    जिल्हा महिला व बालविकास अधिकारी#महिला राज्य सुधार गृह#पीडित महिला#फोन पे#आर्थिक घोटाळा#शांतीकुंज#जिल्हाधिकारी जालना#ed news #चौकशी समिती#अधीक्षक शासकीय महिला राज्यगृह#कंत्राटी कर्मचारी
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleविद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर गुत्तेदाराचा डल्ला!
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर गुत्तेदाराचा डल्ला!

    18/07/2026

    “मॅनेज करा”जि.प च्या प्रस्थापित अधिकाऱ्यांचा चौकशी समितीला दम;तर सीईओंना अजब सल्ला!

    18/07/2026

    विशेष मालिका भाग चार-महाराजांनी अशुभ अमावस्येला शुभ केले!

    17/07/2026
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,121 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,137 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,219 Views

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    10/07/20262,145 Views
    Don't Miss
    Breaking News 06/08/2026

    “शांतीकुंज” मध्येच “अशांती”; महिलांच्या “सुधारगृहातच” आर्थिक”बिघाड”?

    जालना- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राज्यातील पीडित महिलांना, सुधारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला महिला राज्यगृह…

    विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर गुत्तेदाराचा डल्ला!

    “मॅनेज करा”जि.प च्या प्रस्थापित अधिकाऱ्यांचा चौकशी समितीला दम;तर सीईओंना अजब सल्ला!

    विशेष मालिका भाग चार-महाराजांनी अशुभ अमावस्येला शुभ केले!

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    “शांतीकुंज” मध्येच “अशांती”; महिलांच्या “सुधारगृहातच” आर्थिक”बिघाड”?

    विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर गुत्तेदाराचा डल्ला!

    “मॅनेज करा”जि.प च्या प्रस्थापित अधिकाऱ्यांचा चौकशी समितीला दम;तर सीईओंना अजब सल्ला!

    Most Popular

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    युवकाने झाडाला लटकून आत्महत्या

    08/05/20210 Views

    एकाने लावले पिस्टल तर दुसऱ्याने लावला चाकू; वसुंधरा नगरात भरदिवसा थरार

    09/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.