Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आठ जणांच्या टोळीने केकेल्या नकोत्या “उद्योगा”ची उलाढाल 20 लाखांची!!

    पुत्र व्हावा ऐसा… तुकाराम मुंढे यांचे जालना झळकले बॅनर

    एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
    Breaking News

    एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!

    EdTvBy EdTv07/08/2026Updated:07/08/20261 Comment2 Mins Read418 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- सेवानिवृत्तीनंतर आपल्या हक्काचे पैसे मागायला गेलेल्या कर्मचाऱ्याला जुन्या सहकाऱ्यांनी धनादेश देण्यासाठी त्रास दिला. एवढ्यावरच न थांबता मिळणारी लाखो रुपयांची रक्कम पाहून आपल्यालाही काही हिस्सा मिळावा या उद्देशाने दीड लाख रुपयांची लाच मागितली. परंतु सेवानिवृत्त झालेल्या या कर्मचाऱ्यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिनांक 30 जुलै रोजी तक्रार नोंदविली आणि या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवार दिनांक 6 रोजी छापा मारून दीड लाख रुपयांची लाच घेताना पाच जणांना रंगेहत पकडले आहे. विशेष म्हणजे ही संस्था एका प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या राजकीय नेत्याची आहे. 

    जालना येथील महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय प्रबंधक या पदावरून एक कर्मचारी विहित वयोमानानुसार दिनांक 30 जुलै 2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवा काळातील 300 दिवसांची अर्जित रजा मंजूर करून या रजेच्या बदल्यात, आणि इतर लाभांच्या बदल्यात शासनाकडून मिळणाऱ्या 933,408 रुपयांचा धनादेश संस्थेकडून येणे बाकी होता. हा धनादेश देण्यासाठी या प्रकरणातील आरोपी प्राचार्य राहुल नारायण हिवाळे वय 53 वर्ष, अधीक्षक बबन रामदास राठोड व 51 वर्ष राहणार तुपेवाडी तांडा तालुका बदनापूर, पहारेकरी ईश्वरदास अंबादास शिंदे वय 48 राहणार माऊली नगर रो हाऊस जालना, लिपिक कैलास गबाजी कुरंगळे राहणार गोकुळधाम सोसायटी इंदेवाडी, ग्रंथालय सहाय्यक ज्ञानेश्वर मुरलीधर मदन व 51 वर्ष राहणार माऊली नगर जालना या पाच जणांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली.

    सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय जालना येथे छापा मारून वरील पाचही आरोपींना लाच घेताना रंगेहात पकडले आहे. तालुका जालना पोलीस ठाण्यात कलम सात व बारा भ्रष्टाचार प्रतिबंधित अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी शरदचंद्र रोडगे यांनी हा छापा टाकला. हे महाविद्यालय जालना येथील वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करणाऱ्या  राजकीय पुढार्‍याचे आहे.

    सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
    ■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
    ■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    ■दिलीप पोहनेरकर,
    9422219172

     

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    #MSW #समाज कार्य महाविद्यालय#ACB #लाचलुचपत प्रतिबंधक विभाग#लाच#सापळा#छापा#Ed news #गुन्हेगारी#सेवानिवृत्त#पुढारी
    Share. Facebook WhatsApp
    Previous Article“शांतीकुंज” मध्येच “अशांती”; महिलांच्या “सुधारगृहातच” आर्थिक”बिघाड”?
    Next Article पुत्र व्हावा ऐसा… तुकाराम मुंढे यांचे जालना झळकले बॅनर
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आठ जणांच्या टोळीने केकेल्या नकोत्या “उद्योगा”ची उलाढाल 20 लाखांची!!

    29/08/2026

    पुत्र व्हावा ऐसा… तुकाराम मुंढे यांचे जालना झळकले बॅनर

    19/08/2026

    “शांतीकुंज” मध्येच “अशांती”; महिलांच्या “सुधारगृहातच” आर्थिक”बिघाड”?

    06/08/2026

    1 Comment

    1. Kevin Turner on 16/08/2026 12:00 am

      Đọc xong thấy rất bổ ích. Letco chuyên du học Hàn Quốc, tư vấn 1-1 theo năng lực và ngân sách từng bạn. Ghé thăm letco.vn để được hỗ trợ.

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,121 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,140 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,221 Views

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    10/07/20262,152 Views
    Don't Miss
    Breaking News 29/08/2026

    आठ जणांच्या टोळीने केकेल्या नकोत्या “उद्योगा”ची उलाढाल 20 लाखांची!!

    जालना- वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र येत आठ जणांच्या टोळीने नको तो “उद्योग” केला आणि पोलिसांनी या…

    पुत्र व्हावा ऐसा… तुकाराम मुंढे यांचे जालना झळकले बॅनर

    एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!

    “शांतीकुंज” मध्येच “अशांती”; महिलांच्या “सुधारगृहातच” आर्थिक”बिघाड”?

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आठ जणांच्या टोळीने केकेल्या नकोत्या “उद्योगा”ची उलाढाल 20 लाखांची!!

    पुत्र व्हावा ऐसा… तुकाराम मुंढे यांचे जालना झळकले बॅनर

    एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!

    Most Popular

    युवकाने झाडाला लटकून आत्महत्या

    08/05/20210 Views

    मध्यरात्री गोदामावर छापा ऑक्सिजनचे 49 सिलेंडर जप्त

    09/05/20210 Views

    लोधी मोहल्ला दगडफेक प्रकरण; 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    11/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.