Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

    1-Win Bonus Guide: How to Claim, Meet Wagering Requirements & Withdraw Safely

    Roobet alternatives for US players security guide

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » पुत्र व्हावा ऐसा… तुकाराम मुंढे यांचे जालना झळकले बॅनर
    Breaking News

    पुत्र व्हावा ऐसा… तुकाराम मुंढे यांचे जालना झळकले बॅनर

    EdTvBy EdTv19/08/2026No Comments4 Mins Read33 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त आयएएस(IAS )अधिकारी तुकाराम मुंढे हे सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. चुकीची धंदे, चुकीचे व्यवसाय, भेसळ करणाऱ्या व्यवसायिकांशिवाय इतर कोणालाही त्यांचा राग नाही. त्यामुळेच सध्या महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शुभेच्छा आणि अभिनंदन केलेले बॅनर जालन्यातही जालनेकारांनी लावले आहे. कारण 2011 मध्ये याच जालन्यातील बडे हस्तीनी तुकाराम मुंडे यांची अवघ्या 11 महिन्यांमध्ये बदली करायला प्रशासनाला भाग पाडले होते.

    नवीन आणि जुना जालना भागाला जोडणाऱ्या मामादेवी पुलाजवळ तुकाराम मुंढे यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळक ताहेत. खरंतर 2011 मध्ये तुकाराम मुंढे हे जालन्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांनी नूतन वर्षाचा रस्ता चौपदरी केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीला शिस्त लावली. कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. कामचुकार कर्मचाऱ्यांचा कर्दनकाळ म्हणून त्यांची ओळख झाली. विशेष म्हणजे ज्या दिवशी तुकाराम मुंढे हे दौऱ्यावर असतील त्या दिवशी एखादा कर्मचारी घरी गेलाच म्हणून समजा! अशी त्यांच्या कामाची पद्धत होती. सामान्य माणसांना त्यांच्या काळात न्याय मिळत होता. जरी ते कोणाला फारसे भेटत नसले तरी काम करण्याचे पक्के होते. एकूणच गावातील विकास कामांना त्यांनी हात घातला. त्यातीलच एक काम होते बडी सडक वरील छोट्या झालेल्या रस्त्यांना पुन्हा मोठे करणे. कारण बडी सडक वर जसे नाव आहेत तसेच हस्ती देखील आहेत,हे काम त्यांनी हाती घेतले आणि जोडीला होते ते तत्कालीन उपविभागीय अधिकारी प्रवीण दराडे. इकडे बडी सडकच्या रस्त्यावर जेसीबी, ट्रॅक्टर येऊन उभे राहिले तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीच्या हालचाली सुरू झाल्या.अवघ्या दोन दिवसांमध्ये बदली पण झाली. हे सर्व ऐकून नाही तर मी स्वतः त्यांच्यासोबत कामाचा अनुभव घेतला आहे. मी त्यावेळी एका नामांकित दैनिकाचा जिल्हा प्रतिनिधी होतो. त्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत त्यांचा स्वभाव मी जवळून पाहिलेला आहे अनुभवलेला आहे.


    <span;> हे सर्व सांगण्याचा खटाटोप एवढ्यासाठीच एखाद्या अधिकाऱ्याने जर ठरवले की समाजासाठी आपल्याला जटायचेआहे. ती आपली जबाबदारी आहे, त्यासाठीच आपण जीवाचे रान करून रात्रंदिवस अभ्यास करून रक्ताचे पाणी करून एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलो आहोत. तर तो काय करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तुकाराम मुंढे. खरंतर जेवढे अधिकार तुकाराम मुंढे यांना आहेत तेवढेच अधिकार सर्व आयएएस अधिकाऱ्यांना आहेत. मग पाणी कुठे मुरते हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे.मराठीमध्ये एक म्हण आहे “पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा”. कदाचित रक्ताचे पाणी करून ज्या कामासाठी तुकाराम मुंढे आयएएस झाले ते काम आता फळाला येताना दिसत आहे.

     त्यांच्या या कामाचा जालनेकरांना काय फायदा झाला? तर निश्चितच तुकाराम मुंढे जरी जालन्यात नाही आले तरी त्यांच्या प्रशासनाने कधी नव्हते ते काम केले आहे. या कामांमध्ये एप्रिल 26 ते आतापर्यंत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या प्रतिष्ठानांना भेटी देऊन 125 तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी 71 प्रतिष्ठांनाना सुधारणा करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. दहा प्रतिष्ठानाला काही त्रुटी आढळल्यामुळे साठ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तीन दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आणि एकूण 94 अन्न नमुने घेण्यात आले आहेत. त्यामध्ये दूध 27, आईस्क्रीम चार, मसाले सात, पनीर नऊ , तेल 9, तूप 10, बदाम शेक1, लस्सी दोन, दही एक ,बडीशेप दोन, एनर्जी ड्रिंक पाच, आंबे तीन, डाळी दोन, मिठाई एक, आणि बॉटल बंद पाणी एक व इतर दहा असा समावेश आहे.

    <span;>तेरा प्रकरणांमध्ये 84 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .तपासणीसाठी घेतलेल्या 94 नमुन्यांपैकी 38 नमुन्यांचे विश्लेषण अहवाल अन्न व औषधी प्रशासनाला प्राप्त झाले आहेत, त्यापैकी सहा नमुने हे असुरक्षित म्हणजे हानिकारक आहेत. तीन नमुने हे आवश्यक असणाऱ्या दर्जा पेक्षा कमी दर्जाचे आहेत ,पाच नमुने हे बनावट आहेत. तर 24 नमुने हे ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे आहेत. आणि 56 नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. जुलैपासून शासकीय व खाजगी शाळांची, वस्तीगृहाची तपासणी सुरू झाली असून नऊ तपासण्या करण्यात आल्या आहेत.


    <span;>विशेष म्हणजे आत्तापर्यंत या कार्यालयाचे जसे काम सुरू होते तसेच आजही सुरू आहे. परंतु काम करणाऱ्यांची इच्छा जर असेल तर ते होते .हे पुढील पदावरून लक्षात येईल. सध्या अन्न व औषधी प्रशासनाकडे अन्नसुरक्षा अधिकारी यांची चार पदे मंजूर आहेत त्यापैकी एक पद रिक्त आहे. औषध निरक्षक यांची दोन पदे मंजूर आहेत आणि दोन्ही रिक्त आहेत त्यामुळे आत्तापर्यंत अधिकारी नाहीत कर्मचारी नाहीत असे म्हणत काम टाळणाऱ्या या अन्न व औषध प्रशासनाने वरिष्ठ अधिकारी खमक्या आल्यामुळे कामाला सुरुवात केली आहे.

    सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
    ■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
    ■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    ■दिलीप पोहनेरकर,
    9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    #FD #अन्न व औषध प्रशासन#तुकाराम मुंढे #जिल्हाधिकारी जालना#बॅनर#शुभेच्छा# आयुक्त तुकाराम मुंढे#jalna news #jalna live
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleएकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
    Next Article आठ जणांच्या टोळीने केकेल्या नकोत्या “उद्योगा”ची उलाढाल 20 लाखांची!!
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

    02/10/2026

    1-Win Bonus Guide: How to Claim, Meet Wagering Requirements & Withdraw Safely

    02/10/2026

    Roobet alternatives for US players security guide

    01/10/2026
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,122 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,141 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,224 Views

    तहसीलदारांचे निलंबन अटळ?; पण कोणत्या वाचा बातमीमध्ये !

    10/07/20262,157 Views
    Don't Miss
    Breaking News 02/10/2026

    भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

    जालना-पोलीस असल्याची बतावणी करून एका भामट्याने वृद्ध महिलेला लुटले आणि तिच्या अंगावरील साडेचार लाख रुपयांचे…

    1-Win Bonus Guide: How to Claim, Meet Wagering Requirements & Withdraw Safely

    Roobet alternatives for US players security guide

    Casinos like BC Game in the United States

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    भामट्या पोलिसाने वृद्ध महिलेला लुटले; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

    1-Win Bonus Guide: How to Claim, Meet Wagering Requirements & Withdraw Safely

    Roobet alternatives for US players security guide

    Most Popular

    युवकाने झाडाला लटकून आत्महत्या

    08/05/20210 Views

    मध्यरात्री गोदामावर छापा ऑक्सिजनचे 49 सिलेंडर जप्त

    09/05/20210 Views

    लोधी मोहल्ला दगडफेक प्रकरण; 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    11/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.