जालना- जग अशा लोकांचेच कौतुक करतं ,अशा लोकांपासूनच प्रेरणा घेतो जे असामान्य काम करतात .असंच असामान्य काम करणारे एक क्रीडा शिक्षक आहेत जालना येथील श्री सरस्वती भुवन प्रशालेमध्ये शिक्षक. त्यांनी महत्त्वाच्या सात शिखरांपैकी आफ्रिका खंडातील दुसरे एक शिखर दिनांक 12 जून रोजी सर केलं आहे. असे एडवेंचर करणे हा त्यांचा छंद आहे. या जीवघेण्या परंतु रोमांचक गिर्यारोहणाचा छंदाबद्दल EDTV NEWS ने मुलाखत घेतली आणि या मुलाखतीमधून अनेक पैलू उघडले. त्यातीलच महत्त्वाचा पैलू म्हणजे हा फक्त केवळ छंद नाही तर या छंदा मधून तरुणांना रोजगार निर्मिती आणि नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होतात असेही त्यांनी सांगितले आहे.(adventure)
आत्ताच म्हटल्याप्रमाणे अडवेंचर हे तीन प्रकारचे असतात त्यापैकीच गिर्यारोहण हा एक प्रकार आहे उर्वरित दोन प्रकार आपण त्यांच्या मुलाखतीत पाहू शकता.या प्रकारामध्ये किशोर नावकर यांना सन 2000 मध्ये हा छंद जडला आणि आत्तापर्यंत त्यांनी सह्याद्री पर्वत रांगांमध्ये असलेल्या 350 किल्ल्यांपैकी 200 किल्ले सर केले आहेत .सामान्य माणूस शनिवार-रविवारी सुटीच्या दिवशी आराम करणे जास्त पसंत करतो. परंतु नावकर गुरुजींचे मात्र वेगळं आहे, ते शनिवार- रविवार किंवा सुट्टीला संधी समजतात आणि गिर्यारोहणाकडे येतात. गिर्यारोहणामध्ये देखील अनेक प्रकारचे अभ्यासक्रम आहेत जे अभ्यासक्रम केल्यामुळे तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. नोकरीही मिळते एवढेच नव्हे तर गिर्यारोहण करण्यासाठी अनेक संस्था देखील आर्थिक मदत करतात. या मदतीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी पुढे यावं असं त्यांना वाटतं. पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळते ती विद्यार्थीदशेतच! शाळेमधून एनसीसी हा एक वेगळा अभ्यासक्रम शिकवल्या जातो या एनसीसीमुळे विद्यार्थ्यांची वेगळी ओळख निर्माण होते आणि त्यातूनच अशा प्रकारचे असामान्य, रोमांचक आणि गिर्यारोहणाचे अनुभव घेता येतात. असं त्यांचं मत आहे. या सर्व गिर्यारोहणाच्या अभ्यासक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय सैन्यांच्या पाच संस्था आहेत आणि त्यांच्या नियंत्रणाखाली हे अभ्यासक्रम सुरू असतात. त्यांना जशी या गिर्यारोहणासाठी आर्थिक मदत मिळाली, मानसिक पाठबळ मिळालं त्याच पद्धतीने ते देखील गिर्यारोहणासाठी पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करतात .त्यांच्या या सर्व प्रवासाविषयीची प्रेरणादायी विशेष मुलाखत फक्त www.edtvjalna.com या संकेतस्थळावर आपण युट्युब वर फक्त मुलाखत देखील पाहू शकता.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
*दिलीप पोहनेरकर * ९४२२२१९१७२