जालना जिल्हा

…ते निवडणुकीच्यावेळी पाहू -काँग्रेसचे जिल्हा प्रभारी ओझा

जालना- सर्वच पक्षांमध्ये निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे, आणि काँग्रेस पक्षाचा मोठा मतदार म्हणून मुस्लिम समाजाकडे पाहिले जाते. आता या समाजाला शिवसेना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे तुम्हाला काही धोका होऊ शकतो? या प्रश्नाचे उत्तर देताना काँग्रेसचे जिल्हा प्रभारी रामकिसन ओझा यांनी तो निवडणुकीचा प्रश्न आहे असेच सांगून या विषयावर बोलणे टाळले. काँग्रेसचे जिल्हा प्रभारी म्हणून राम किसन ओझा हे पहिल्यांदाच जालन्यात आले होते .त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला

 

यावेळी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शहराध्यक्ष शेख महमूद, प्रभाकर मामा पवार, आदींची उपस्थिती होती. याच प्रश्न सोबत, आता काँग्रेस आणि शिवसेना हे सत्तेमध्ये सोबत आहेत आणि भविष्यात जर सत्ता मिळवायची असेल तर या दोघांना एकत्र आणणे गरजेचे आहे, कारण सद्य परिस्थितीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे हाडवैर आहे .त्यामुळे या दोघांमध्ये समेट घालणार का? या प्रश्नाचे देखील उत्तर देण्याचे ओझा यांनी टाळले आणि आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यांची बाजू सांभाळून घेत या राजकीय बातम्यांसाठी आपण वेगळी पत्रकार परिषद घेऊन असे सांगत ही पत्रकार परिषद आटोपती घेतली.
-दिलीप पोहनेरकर,
9422219172,डाउनलोड
https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.apk

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.