जालना- तुझ्यासाठी वाटेल ते करतो, तू म्हणशील तसंच होईल, अशा भूलथापा मारत वेळ आल्यावर ग्लासभर पाणी न देणारे अनेक प्रेमीयुगुल पाहायला मिळतात. मात्र लग्नाच्या वेळी साता जन्माच्या गाठी बांधून त्या प्रत्यक्षात उतरविणारे क्वचितच पाहायला मिळतात. हा योगायोग म्हणावा की दुर्दैवी घटना हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. मात्र ज्यांचं निधन झालं त्या दोघांनीही एक दुसऱ्याला दिलेला शब्द पाळला एवढे मात्र निश्चित. साथ जियेंगे साथ मरेंगे म्हणत त्या दोघांनीही जग सोडलं पण साथ सोडली नाही.आयुष्यभर सुख- दु:खात सोबत राहिलेल्या जोडीदारांचा अंत सुद्धा सोबतच व्हावा. हा दैवयोग आणि दुर्मिळच घटना आहे. अशीच घटना गवळी पोखरी ता जालना येथे घडली.
गवळीपोखरी येथील बाजीराव अश्रूबा कायंदे (९६) यांचे सोमवारी मध्यरात्री बारा वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या निधनाची वार्ता आप्त स्वकीय, नातेवाईक यांच्या पर्यंत पोहचत नाही तोच मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी रूक्मीनबाई बाजीराव कायंदे ( ९०) यांचेही पहाटे चार वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले .त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मूली, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासनारे पुण्यवंत कायंदे दाम्पत्याने ” अवघाची संसार सुखाचा करून” नातवंडे, पतवंडे पाहिली व अंगारिका चतुर्थी च्या पवित्र दिवशी ते सोबतच पंचतत्त्वात विलीन झाले. अखिल भारतीय वंजारी युवा संघटनचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जायभाये यांचे ते आजी -आजोबा होते.
____________
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Previous Article2018 चा पिक विमा अजूनही मिळेना
Next Article लाच देणे हा देखील गुन्हा: अभियंता जाळ्यात