Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

“त्या” प्रकरणी गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षक निलंबित ;गुन्हा दाखल करण्याचे सीईओंचे आदेश

जालना- परतुर गटशिक्षणाधिकारी कार्यालया अंतर्गत शिक्षकांच्या पगारातून कपात केलेली आयकाराची रक्कम हडप करणाऱ्या शालार्थ समन्वयकावर आणि या प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या दोघांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिणियार यांनी दिले आहेत.

परतुर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालया अंतर्गत असणाऱ्या शिक्षकांचा दर महिन्याला आयकर कपात केला जातो. ही कपात केलेली रक्कम गटशिक्षणाधिकारी यांच्या खात्यातून स्वतःच्या खात्यात वर्ग करणारा शालार्थ समन्वयक सहशिक्षक चंद्रकांत पौळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्या परतुर, आणि या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणारे गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे या दोघांनाही जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मणियार यांनी निलंबित केलं आहे तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांना दिले आहेत.

दरम्यान या प्रकरणात चंद्रकांत पौळ यांनी 14 वेळा ही रक्कम स्वतःच्या खात्यात वळती केली आहे आणि एक कोटी 34 लाख 45 हजार 438 रुपयांची एकूण रक्कम आहे. दरम्यान अपहार केलेल्या या रकमेपैकी चंद्रकांत पौळ यांनी यापूर्वीच काही रक्कम भरलेली आहे तूर्तास सुमारे 50 लाख रुपये चंद्रकांत पोळ यांच्याकडे बाकी आहे.

त्या शिक्षकांचे पुढे काय?ज्या गटशिक्षणाधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे शालार्थ समन्वयकाने हा अपहार केला आहे या दोघांवर ही कारवाई झाली आहे आणि होणार आहे. परंतु ज्या शिक्षकांच्या पगारातून आयकाराची रक्कम कपात झाली त्या शिक्षकांचे पुढे काय? असा प्रश्न  Ed tv news ने   मुख्यकार्यकारी अधिकारी जगदीश मणियार यांना विचारला, त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याकडे नाही ,पुढे न्यायालयात जी परिस्थिती उद्भवेल त्या अनुषंगाने निर्णय घेतल्या जातील.

महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

EdTv

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button