जालना -प्रा. सुरेखा मत्सावार यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. त्यांनी लिहिलेल्या किनार आणि स्वप्नांच्या अलिकडले या दोन कथा संग्रहामधून महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सशक्त कथा वाचायला मिळतात. स्वप्नावर आधारित नव्हे तर प्रत्यक्ष हाकिकत मध्ये आणि वास्तववादी या कथा आहेत .अशी प्रतिक्रिया मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्य डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी दिली.
प्रा सुरेखा मत्सावार यांच्या स्वप्नांच्या अलीकडले, किनार आणि महात्मा गांधी प्रणित शिक्षण संकल्पना या तीन पुस्तकांचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले, यावेळी व्यासपीठावर डॉ. प्रतिभा श्रीपत, इंजिनीयर एस.एन. कुलकर्णी, लेखिका सुरेखा मत्सावार ,यांच्यासह मसापाचे सचिव पंडित तडेगावकर, शिवाजी कायंदे, वैशाली मत्सावार, शुभांगी नेवासेकर, डॉ. जितेंद्र मत्सावार यांची उपस्थिती होती. प्रकाशनानंतर एस. एन. कुलकर्णी आणि डॉ प्रतिभा श्रीपत यांनी प्रकाशन झालेल्या साहित्यावर भाष्य व्यक्त केले.