जालना- जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना नदी मध्ये होणाऱ्या अतिक्रमणाचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. आत्तापर्यंत निवेदने चर्चा, विनंती करून थकलेल्या कुंडलिका सीना नदी बचाव संघर्ष समितीने आता शेवटचा पर्याय म्हणून आव्हानच दिलं आहे. रामतीर्थाच्या बाजूला आज पासून या संघर्ष समितीने उपोषण सुरू केला आहे. आणि ट्रेलर वर जमेल! का पूर्ण पिक्चर पाहायचा? असे थेट आव्हानच महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिलं आहे.
जालना शहरातील कुंडलिका आणि सीना नदी मध्ये होणारे अतिक्रमण काढून घ्यावे. असे यापूर्वी महानगरपालिकेला अनेक वेळा निवेदने दिली आहेत. एवढेच नव्हे तर गेल्या तीन वर्षांपूर्वी या दोन्ही नद्यांचे पात्र स्वच्छ करण्याची जबाबदारी देखील कुंडलिका सीना नदी बचाव समितीने पार पाडली होती. त्यावेळी नदीपात्र स्वच्छ करत असताना दोन्ही बाजू जेसीबी च्या साह्याने रुंद ही करण्यात आल्या होत्या. परंतु मागील सहा महिन्यांपासून या नदीपात्रामध्ये पुन्हा अतिक्रमणे वाढली आहेत. भर टाकून ठीक ठिकाणी व्यवसाय सुरू झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी एका नदीत मध्ये तर दुहेरी रस्ताच करण्यात आला होता. त्यावेळी देखील महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते आणि सध्या जिथे उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी देखील आयुक्त श्री. खांडेकर यांनी पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी करून नदीपात्रातील अतिक्रमणे काढली जातील असे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप पर्यंत कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे आज या पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. कुंडलिका सीना नदी बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह समस्त महाजन ट्रस्ट मुंबई च्या महाराष्ट्र प्रभारी नूतन देसाई हे या उपोषणाचे नेतृत्व करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.