जालना- येथील औद्योगिक वसाहती मधील स्टीलच्या कारखान्यांमधून कोट्यावधी रुपयांचा जीएसटी मिळत असताना केवळ जालना महानगरपालिकेला तुटपुंजी रक्कम मिळाली आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे.
त्यासोबतच धुळे येथील विश्रामगृहात सापडलेल्या रोख रक्कम संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे चे स्थानिक नेते झोपले आहेत का? असा प्रश्नही त्यांनी केला .याच वेळी भाजपामध्ये देखील माझ्यासारखे सम दुःखी आहेत. परंतु ते देखील धुळ्याच्या प्रकरणावर गप्प आहेत.
धुळ्याच्या विश्रामगृहात घडलेल्या प्रकारा संदर्भात बोलताना गोरंट्याल यांनी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची नारको टेस्ट करा आणि त्यासोबत त्याच्या आकाचीही नार्कोटेस्ट करावी अशी पुन्हा एकदा मागणी केली. दरम्यान या नारको टेस्टमध्ये किशोर पाटील याने पाचशे करोड पेक्षा जास्त मालमत्ता कमावल्याचे पुढे येईल असा दावाही त्यांनी केला. एस. आय.टी(SIT) ची व्याख्या आता विशेष तपास पथक अशी नाही तर” सेव इन लीगल टीम “अशी करावी लागेल असेही ते म्हणाले.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
दिलीप पोहनेरकर –९४२२२१९१७२