जालना -विद्यार्थ्यांना लहानपणापासून प्रयोग करण्याची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये असलेले तंत्रज्ञान विकसित व्हावं या उद्देशाने आज शाळेच्या पहिल्या दिवशी श्री.सरस्वती भुवन प्रशाला जालना येथील विद्यार्थ्यांचे मानवी प्रतिकृतीतील रोबोटच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष सुनील रायठा, सदस्य डॉ. माधव आंबेकर मुख्याध्यापक दिलीप महाजन यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते. पहिली दुसरीतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया खूप बोलक्या होत्या, आईने माझे आवरून दिले आज माझा खू…प चांगला दिवस आहे!.
शैक्षणिक वर्ष 2023 -24 च्या शाळेचा आजचा पहिला दिवस.शाळेत आलेल्या नव्या आणि जुन्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. नव्या वर्गात बसायला मिळणार, जुने मित्र भेटणार, शिक्षकही भेटणार, या सर्व आनंदाने विद्यार्थी उत्साहीत दिसत होते. तर पुन्हा एक नवीन आणि संस्कारीत पिढी घडविण्याची संधी शिक्षकांना मिळणार होती त्यामुळे शिक्षक देखील आनंदात होते. पहिल्याच दिवशी काही प्रतिकात्मक विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचेही वाटप करण्यात आले.पहिली दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यासाठी आईने कशी तयारी करून दिली हे देखील आवर्जून सांगितले .
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com