गॅस सिलेंडरचे पिकप आणि बसची समोरासमोर धडक एक ;ठार 37 जखमी
सिल्लोड -एसटी बस आणि सिलेंडर घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकप ची समोर समोर धडक झाली. या अपघातामध्ये बसमधील 37 प्रवासी जखमी झाले तर बोलेरो चे चालक ठार झाले आहेत.
सिल्लोड भराडी रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सिल्लोड हुन पाचोऱ्या कडे जाणारी बस क्रमांक एम एच 14 बीटी 4006 ही सायंकाळी निघाली होती ,त्याच दरम्यान गॅसचे सिलेंडर वाटप केल्यानंतर रिकामे सिलेंडर घेऊन भराडी कडून सिल्लोडकडे येणारे वाहन बोलेरो पिकप या दोघांची वांगी फाट्याजवळ समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये बोलेरोचे चालक सुरेश गुंजाळ हे जागीच ठार झाले आहेत. तर बसमधील 37 प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांसह पोलीस निरीक्षक सिताराम मेहत्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात भरती करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान पिकप मध्ये अडकलेल्या बोलेरो चालक गुंजाळ यांचा मृतदेह जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यासाठी जेसीबी बोलावून पिकप मधून रस्ता करावा लागला. जखमींना सिल्लोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते ,काही रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित रुग्णांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.