सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीतील “त्या” लैंगिक छळ प्रकरणी;गुन्हा दाखल
जालना -दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या पतीसाठी रक्त आणण्यास गेलेल्या विवाहिते सोबत सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये असभ्य वर्तन करून तिचा लैंगिक छळ करण्यात आला होता. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक सहा रोजी रक्तपेढीतील कर्मचारी ताकीत शेख याच्याविरुद्ध लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.5 सप्टेंबर रोजी विवाहितेनी सांगितलेली आपबीती
रूपाली भगवान चाटसे ही विवाहिता तिच्या पतीला असलेल्या सिकलसेल या आजारासाठी रक्त आणायला सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये दिनांक 27 सप्टेंबर रोजी गेली होती. त्यावेळी तेथील कर्मचारी ताकीत शेख याने रक्ताच्या पिशवीसाठी डॉक्टर शेजुळ यांना फोन न करता मला कॉल करून या असे म्हणून पहिल्या दिवशी रक्ताची पिशवी दिली.दुसऱ्या दिवशी पुन्हा रक्ताची गरज भासल्याने दुपारी तीन वाजेच्या सुमारास रुपालीने ताकीद शेख याला फोन करून रक्ताची गरज असल्याचे सांगितले. त्यावेळी ताकीद शेख याने तुम्ही पाच वाजता या असे म्हणाला .दरम्यान साडेपाच वाजता रूपाली चाटसे या रक्तपेढीमध्ये गेल्यानंतर त्यांना सोफ्यावर बसवले आणि गाल ओढून तुम्ही किती छान दिसता ?असे असंभ्यवर्तन केले. त्यामुळे रूपाली चाटशे यांना लज्जा आली आणि त्यांनी तेथून इमारतीच्या बाहेर आल्या. त्यानंतर पुन्हा त्यांच्या फोनवर वारंवार फोन केला गेले परंतु चाटसे यांनी ते उचलले नाहीत. त्यामुळे ताकीद शेख त्यांच्या मागे आला आणि रक्ताची पिशवी तयार आहे घेऊन जा असे सांगितले .त्यादरम्यान चाटसे यांच्या बहिणीचा फोन आल्यामुळे त्या फोनवर बोलत असतानाच ,”तू फोन ठेव मला तुझ्याशी बोलायचे आहे “असे ताकीद शेख याने सांगितले. परंतु चाटसे या तिथे न थांबता निघून गेल्या. दरम्यान भगवान चाटशे हे रुग्णालयातच भरती असल्यामुळे तक्रार देण्यासाठी रूपाली सोबत कोणीही नव्हते, दरम्यानच्या काळात भगवान चाटसे यांनी यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक प्रताप घोडके आणि रक्त संक्रमण पिढीचे वरिष्ठ अधिकारी यांना या संदर्भात माहिती दिली होती. मात्र कोणतीच कारवाई न झाल्याने 5 सप्टेंबर रोजी यासंदर्भात चौकशी करण्यासाठी रूपाली आणि भगवान चाटशे हे दोघेही सामान्य रुग्णालयात आले होते. परंतु अधिकारी न भेटल्याने त्यांनी हा सर्व प्रकार प्रसार माध्यमांना सांगितला .त्यामुळे पुन्हा हे प्रकरण उघडकीस आले आहे. दरम्यान कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड विधान कलम 354 (अ )अन्वये महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी मधील कर्मचारी आतिक शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करीत आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
-दिलीप पोहनेरकर,9422219172