जालना-गेल्या दोन वर्षांपासून जालना जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपीला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये बऱ्यापैकी यशही मिळत आहे. यावर्षी जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्याचे ठरवले होते. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये रोहिलागड येथे विवेकानंद शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर संचलित जांबुवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. या केंद्रावर अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी छापा मारला असता दोन विद्यार्थी कॉपी करताना सापडले आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांना परीक्षेतून मुक्त करण्यात आल्या. तसेच या कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शिक्षकाला देखील परीक्षेतून कार्यमुक्त केले आहे.

जामुवंत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय हे कॉपी सापडणारे जिल्ह्यातील एकमेव केंद्र ठरले आहे. जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी परीक्षेपूर्वी स्पष्ट सूचना देऊन विद्यार्थ्यांना कॉपी करू नये ,असे आवाहन केले होते. तसेच शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना मदत करू नये ,कदाचित त्यांना नोकरी गमवावी लागेल आणि ज्या संस्थेत हा प्रकार आढळून येईल त्या संस्थेची मान्यता देखील रद्द होऊ शकते इथपर्यंत कडक सूचना दिल्या होत्या. असे असतानाही संस्थेने एवढी हिंमत दाखवली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्याच्या नावाला ढब्बा लागला आहे. आता प्रशासन या संस्थेवर काय कारवाई करेल याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172
